RR vs SRH, IPL 2023: संदीप शर्माच्या No Ball ने आठवला RP Singh; 10 वर्षापूर्वी असं काय घडलं होतं?

RR vs SRH, IPL 2023: संदीप शर्माची (Sandeep Sharma)  एक चूक आता राजस्थानचे प्लेऑफचे दरवाजे बंद करू शकते. या सामन्यानंतर ट्रेंड होतोय तो आरपी सिंह (RP singh). त्याचं कारण काय जाणून घेऊया..

Saurabh Talekar | May 08, 2023, 00:54 AM IST

RP singh, IPL 2013:  हैदराबादने (Sunrisers Hyderabad) शेवटच्या चेंडूवर षटाकार ठोकत राजस्थानचे (Rajasthan Royals) 215 धावांचं भलंमोठं आव्हान पार केलं आणि सामना 4 विकेट्सनी जिंकला. जिंकलेला सामना कसा हरावा याची प्रचिती देणारा हा सामना राहिला. राजस्थान जिंकली असं झळकलेलं असताना अंपायरने नो बॉल (No Ball) दिला आणि समदने (Abdul Samad) सिक्स खेचत सामना आणि 2 अंक फिरवले. संदीप शर्माची (Sandeep Sharma) एक चूक आता राजस्थानचे प्लेऑफचे दरवाजे बंद करू शकते. या सामन्यानंतर ट्रेंड होतोय तो आरपी सिंह (RP singh). त्याचं कारण काय जाणून घेऊया..

1/5

2013 साली चेन्नई विरुद्ध आरसीबी (CSK vs RCB) असा सामना खेळवण्यात आला होता. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचला. सीएसकेला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती.

2/5

भारताचा स्टार बॉलर आरपी सिंह याच्या हातात बॉल सोपवण्यात आला. ओव्हर शॉर्ट थर्ड मॅनला फोर मारत जडेजाने (Ravindra Jadeja) आरपीचं स्वागत केलं.

3/5

दुसऱ्या चेंडूवर लाँग-ऑनवर एका जबरदस्त षटकाराने सीएसकेच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला. मॉरिस देखील मैदानावर पाय रोवून उभा होता. सामन्याचा अखेरचा चेंडू होता.

4/5

चेन्नईला एका बॉलवर 2 धावाची गरज होती. स्टाईकवर होता जड्डू. पूल लेंथ बॉलवर फ्लिक करत जडेजाने फटका मारला. मात्र, चेंडू थेट फिल्डरच्या हातात. अखेरच्या बॉलवर विकेट मिळवत सामना जिंकला असं सर्वांना वाटलं. 

5/5

सामना जिंकला म्हणून ऑरेंज कॅप पटकावणारा विराट आनंदाने नाचत देखील होता. मात्र, अंपायरने नॉ बॉल दिला आणि हातात आलेला विजय आरसीबीला हुलकावणी देऊन गेला.