ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल

अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांच्या आठवणींना उजाळा. 

Sep 02, 2019, 13:03 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न बंधनात अडकले होते. या जोडीने एकत्र चक्क १२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. लग्नाआधी ते ५ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलं देखील आहे. एक मुलगी रिधिमा कपूर आणि रणबीर कपूर. ऋषी कपूर हे कपूर कुटुंबाचे तिसरे वारस आहेत. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

चॉकलेट बॉय

चॉकलेट बॉय

ऋषी कपूर राज कपूर यांचे पूत्र त्याचप्रमाणे निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता पृथ्वीराज कपूर यांचे नातू आहेत. रोमॅन्टीक भूमिकांमुळे कलाविश्वात त्यांची ओळख चॉकलेट बॉय म्हणून झाली. 

2/5

कलाविश्वात पदार्पण

कलाविश्वात पदार्पण

१९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. या चित्रपटामध्ये ते वडिलांच्या बालपणीच्या भूमिकेत झळकले होते. 

3/5

९२ चित्रपटांमध्ये रोमॅन्टीक भूमिका साकारल्या

९२ चित्रपटांमध्ये रोमॅन्टीक भूमिका साकारल्या

ऋषी कपूर यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल ९२ चित्रपटांमध्ये रोमॅन्टीक भूमिका साकारल्या आहेत. 

4/5

कलाविश्वातील ओळख

कलाविश्वातील ओळख

ऋषी कपूरचा चित्रपट प्रवास सर्वांसाठी संस्मरणीय आहे.

5/5

उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये

उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये

ऋषी कपूर सध्या त्यांच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. ते लवकरच आपल्या मायदेशी परतणार आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये ते कर्करोगावर उपचार घेत आहेत.