हॉटेलसारखी ग्रेव्ही आता बनवा घरीच, मुलंही आवडीने खातील; या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

चमचमीत खाण्याची आवड सगळ्यांनाच असते. पण त्यासाठी सतत हॉटेलमध्ये जाणे खिशाला परवडतही नाही आणि आरोग्यासाठी ही चांगले नसते. पण आरोग्याची आणि आपल्या बजेटची काळजी घेऊन तुम्ही घरीच्या घरीच चमचमीत हॉटेलसारखी भाजी करु शकता पण त्यासाठी या टिप्स फॉलो करा. 

Mansi kshirsagar | Dec 30, 2023, 17:51 PM IST

चमचमीत खाण्याची आवड सगळ्यांनाच असते. पण त्यासाठी सतत हॉटेलमध्ये जाणे खिशाला परवडतही नाही आणि आरोग्यासाठी ही चांगले नसते. पण आरोग्याची आणि आपल्या बजेटची काळजी घेऊन तुम्ही घरीच्या घरीच चमचमीत हॉटेलसारखी भाजी करु शकता पण त्यासाठी या टिप्स फॉलो करा. 

1/7

हॉटेलसारखी ग्रेव्ही आता बनवा घरीच, मुलंही आवडीने खातील; या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

 घरी अचानक पाहुणे आले की गृहिणींची एकच धांदल उडते. अशावेळी पाहुण्यांसाठी झटपट एखादा पदार्थ बनवायचा ठरवला तरी आयत्यावेळी सुचत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला काही हॉटेलसारखी ग्रॅव्ही घरच्या घरी कशी बनवता येईल. याच्या काही टिप्स सांगणार आहोत.   

2/7

तूप

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

घरीच ग्रेव्हीची भाजी तयार करताना तेलाऐवजी तुपाचा वापर करा. त्यामुळं गेव्ही चविष्ठ होईल. तसंच, तुपावर ग्रेव्हीचा मसाला टाकल्यास रंगदेखील छान येईल. 

3/7

पालक पनीर

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

 पालक पनीरसाठी ग्रेव्ही तयार करत असताना आधी पालक गरम पाण्यात थोडा उकडून घ्या. गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेचच थंड पाण्यात टाका ज्यामुळं हिरवेपणा कायम टिकतो. 

4/7

पनीर फ्राय

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

ग्रेव्हीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी ते कोमट पाण्यात पाच ते दहा मिनिटे बुडवून मग ठेवा किंवा एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यावर पनीरचे तुकडे परतवून घ्या. 

5/7

ग्रेव्हीचा रंग

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

ग्रेव्हीचा छान रंग यावा यासाठी घरात तयार केलेलेच मसाले वापरावे. 

6/7

तेलात परतवून घ्या

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

भाजी करताना सर्वात आधी तेलात ग्रेव्ही परतून घ्यावी. त्यानंतर मसाले टाकून पुन्हा परतवून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की मगच भाजी टाका. 

7/7

नारळाचे दूध

restaurant style gravy for sabji how make at home tips in marathi

ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, का  जूची पेस्ट किंवा खसखसची पेस्ट टाकल्यास छान दाटसरपणा येतो.