PHOTO : 6 वर्षांनी मोठी आणि 3 मुलांच्या आईवर जडलं होतं आरडी बर्मनचं प्रेम, लता मंगेशकर यांचं ते पत्र ठेवलं होतं आयुष्यभर जपून

राहुल देव बर्मन म्हणजेच आपले पंचम दा...यांचं आयुष्यातील चढ - उतार हे अतिशय खडतर होता. पैशांची चणचण, जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती ते मिळाली नाही. एवढंच नाही तर दोन लग्न करुनही संसारच सुख नाही. 

Jun 28, 2024, 17:00 PM IST
1/10

महान संगीतकार पंचम दा यांनी वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. जेव्हा त्यांच्या संगीताला लोकांनी नाकारलं होतं. तेव्हा त्यांचा संगीतबद्ध शेवटचा चित्रपट लव्ह स्टोरी त्याच्या निधनानंतर रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक गाणे हे गाजले. पण हे यश पाहण्यासाठी ते जगात नव्हते. 

2/10

आरडी बर्मन यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचं पहिलं गाणं ते 9 वर्षांचे होते तेव्हा लिहिलं होतं. 'ऐ मेरी टोपी पलट के आ' हे गाणं  वडिलांनी 'फुंटूश'  या चित्रपटात वापरलं होतं. 

3/10

पंचम दा यांनी त्यांची फॅन रीटा पटेलशी लग्न केलं. असं म्हणतात, रीटा यांनी त्यांच्या मैत्रीणीशी पैज लावली होती की, त्या पंचम दासोबत डेटवर जाईल. ही पैज रीटा यांनी जिंकली आणि एवढंच नाही तर त्यांनी लग्नही केलं. 

4/10

पण हे लग्न फार काळ टिकलं नाही, त्यांचा घटस्फोट झाला. मग त्यांच्या आयुष्यात आल्या आशा भोसले. मीडिया रिपोर्टनुसार आशा भोसले यांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा पंचम दा 10 वर्षांचे होते तेव्हा झाली होती. तेव्हा आशाताई या दोन मुलांच्या आई होत्या. 

5/10

त्यानंतर 1956 मध्ये त्यांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी आशाताईंनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. 'तीसरी मंझिल' साठी पंचम दा यांनी आशाताईंशी संपर्क केला होता. हा तो काळ होता जेव्हा आशाताईंचा घटस्फोट झाला होता आणि त्या गरोदर होत्या. त्यावेळी आशाताई दोन मुलांसह बहिणीच्या घरी राहत होत्या. 

6/10

पंचम दा आणि आशाताई त्या काळात समदु:खी होत्या. एकमेकांसोबत गाणी गात ते प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी पंचम दा यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी प्रपोज केले. पण, आशाने लग्नाला साफ नकार दिला. त्यानंतर दोघांना एकत्र आणण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे. आशाताई या पंचम दापेक्षा मोठ्या होत्या. 

7/10

वय हे लग्न न करण्याच कारण नव्हतं. तर आशाताई पहिल्या लग्नाच्या दु:खातून बाहेर आल्या नव्हत्या. त्याशिवाय आईच्या विरोधासमोर पंचम दांना काही करता आलं नाही. अखेर त्यांनी 1980 मध्ये लग्न केलं. 

8/10

लग्नाच्या वेळी पंचम दा यांनी लतादीदी यांना गिफ्ट म्हणून एक पत्र मागितले. ज्यामध्ये सुंदर वैवाहिक जीवनासाठी मी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सांगणारे ते पत्र असावे अशी त्यांनी मागणी केली. दीदींनी ते पत्र पंचम दा यांना दिले आणि त्यांनी ते आयुष्यभर सांभाळून ठेवले. 

9/10

एकीकडे आशाताईंशी त्यांचं लग्न फार काळ टिकल नाही हे दु:ख आणि दुसरीकडे आईचं आजारपण यामुळे पंचम दा खचले होते. एक काळ असा आला तेव्हा त्यांच्या संगीताला लोकांनी नाकारलं. त्यांना पैशांची चणचण जाणवत होती. त्यांच्यातील प्रतिभा आणि कौशल्यानुसार प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही. 

10/10

दरम्यान दुसरीकडे निव्वळ हा योगायोग पंचम दा यांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील 90 लेख, दुर्मीळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं शुक्रवारी मुंबईत प्रकाशन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं