Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल. 

| Dec 11, 2024, 23:14 PM IST
1/8

त्याने आपल्या डॅशिंग स्टाइलने आणि टॅलेंटने चाहत्यांना वेड लावले. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. 

2/8

रजनीकांत यांचा जन्म 1950 मध्ये बेंगळुरू इथल्या एका मराठी हिंदू कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव शिवाजी राव गायकवाड आहे. ते एका सामान्य कुटुंबातील होते. रजनीकांत यांचे वडील पोलीस हवालदार होते. 

3/8

अभिनेता होण्यापूर्वी रजनीकांत यांनी पोर्टर आणि बस कंडक्टर म्हणूनही काम केलं. याच काळात त्यांनी कन्नड पौराणिक नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.

4/8

हाच तो काळ होता जेव्हा तमिळ चित्रपट निर्माते के बालचंदर यांनी रजनीकांत यांना पाहिलं. त्यांना 1975 मध्ये 'अपूर्व रागांगल' मध्ये काम करण्याची संधी दिली. रजनीकांत यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत खूप प्रसिद्धी मिळवलीय.

5/8

अहवालानुसार, त्याची एकूण संपत्ती 51 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 430 कोटी इतकी आहे. रजनीकांत संपत्तीच्या बाबतीत चांगल्यांना कलाकारांना मागे टाकलंय. ते एका चित्रपटासाठी 50 रुपये आकारतात.

6/8

चेन्नईच्या पोस गार्डनमध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे. Lifestyle Asia च्या रिपोर्टनुसार या घराची किंमत 35 कोटी रुपये आहे.

7/8

त्याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं तर रजनीकांतकडे दोन रोल्स रॉयस मॉडेल आहेत. रिपोर्ट्सनुसार, Rolls Royce Ghost ची किंमत 6 कोटी रुपये आणि इतर Rolls Royce Phantom ची किंमत 16.5 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 1.77 कोटी रुपयांची BMW X5, 2.55 कोटी रुपयांची Mercedes Benz G Wagon आणि Lamborghini Urus आहे. त्यांच्याकडे 6 कोटी रुपयांची बेंटले ल्युमिनस कारही आहे.

8/8

याशिवाय रजनीकांत मॅरेज हॉल देखील चालवतात. त्यांच्या लग्नमंडपाची किंमत 20 कोटी रुपये असून त्याचे नाव राघवेंद्र मंडपम आहे. दरम्यान ते 2025 मध्ये कुलीमध्ये दिसणार असून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.