'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन

रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर  

| Nov 30, 2024, 13:12 PM IST
1/7

रश्मिका मंदाना

साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

2/7

'पुष्पा 2'

सध्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री प्रचंड व्यस्त आहे. या चित्रपटात तिने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. 

3/7

5 डिसेंबर

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' चित्रपटापासून करिअरला सुरुवात केलीय. 

4/7

फिल्म इंडस्ट्री

काही वर्षांमध्ये अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेणारी ती दुसरी कलाकार आहे. 

5/7

नेटवर्थ

रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. ती चित्रपट आणि जाहिरातींमधून देखील लाखो रुपये कमवते. 

6/7

'पुष्पा 2' मानधन

काही रिपोर्टनुसार असा देखील दावा केला जात आहे की, 'पुष्पा 2' चित्रपटासाठी रश्मिका मंदानाने 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 

7/7

'सिंकदर'

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सलमान खानसोबत दिसणार आहे. रश्मिका आणि सलमान खानचा 'सिंकदर' चित्रपट 2025 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.