ती फायरब्रँड महिला IPS अधिकारी अन् तो कॅबिनेट मंत्री; सूत जुळलं आणि अडकले लग्नात, फोटोंची जोरदार चर्चा

Harjot Singh Bains Married with IPS: पंजाबचे (Punjab) कॅबिनेट मंत्री हरजोत सिंह बैंस (harjot singh bains) विवाहबंधनात अडकले आहेत. आयपीएस अधिकारी ज्योती यादव (Jyoti Yadav) यांच्याशी त्यांनी लग्न केलं आहे. ज्योती यादव पंजाब पोलिसांत पोलीस महानिरीक्षक पदावर आहेत. या लग्नाची सोशल मीडियावर (Social Media) एकच चर्चा रंगली आहे.   

Mar 26, 2023, 17:52 PM IST

1/7

2/7

पंजाबमधील रोपडच्या नंगलमधील गुरुद्वारात दोघांचा विवाहसोहळा पार पडला.   

3/7

गुरुद्वारात लग्न केल्यानंतर संध्याकाळी हायप्रोफाइल रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनसाठी अनेक नेते हजेरी लावण्याची शक्यता आहेय   

4/7

ज्योती यादव पंजाब पोलिसांत एसपी आहेत. मानसा येथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी त्या लुधियानात ADCP पदावर राहिल्या आहेत.   

5/7

आयएएस ज्योती यादव यांचं कुटुंब हरियाणाच्या गुरुग्राम येथे राहतं. हरजोत सिंह यांच्याप्रमाणे ज्योती यादवही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात.   

6/7

हरजोत सिंह यांचे इन्स्टाग्रामवर 71 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर आयपीएस ज्योती यादव यांचे इन्स्टाग्रामवर 68 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.   

7/7

रिसेप्शनला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहभागी होणार आहेत. आम आदमी पक्षाचे अनेक नेते शुभेच्छा देण्यासाठी हजर राहण्याची शक्यता असते.