Photo: भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ... महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले महास्नान

PM Modi at Mahakumbh Photo: उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हजेरी लावली. गंगा नदीवर असणाऱ्या त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केले.   

Feb 05, 2025, 14:11 PM IST
1/7

10.05 मिनिटांनी पंतप्रधान मोदी प्रयागराजला पोहचले. काटेकोर सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी नौका विहार करत कुंभमेळ्याचा आढावा घेतला.  

2/7

 पंतप्रधानांनी स्नान करताना भगवे कपडे आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली होती. मंत्रोच्चारांच्या पठणादरम्यान पंतप्रधानांनी हे महास्नान केले.  

3/7

महत्त्वाची बाब म्हणजे या महास्नानादरम्यान पंतप्रधान स्वत: देखील मंत्रांचा उच्चार करताना दिसले.  

4/7

सूर्याला अध्य अपर्ण केल्यानंतर त्यांनी माळेचा जप केला.  

5/7

 त्रिवेणीच्या पावन संगमावर स्नान केल्यानंतर पंतप्रधानांनी गंगेची पूजा-अर्चा केली, यावेळी 26 साधूसंतांसोबत त्यांनी हा विधी पार पाडला.  

6/7

 या दरम्यान पंतप्रधानांनी हिमाचली टोपी घातली होती, त्यावर काळा कोट आणि भगवी शाल घेतली होती.  

7/7

 पूजा विधी पूर्ण झाल्यावर पंतप्रधान सर्व आखाड्यांच्या महामंडलेश्वरांची भेट घेतील.