टी-20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासह पंतप्रधान मोदींच्या मनमोकळ्या गप्पा; ट्रॉफीसह केलं फोटोशूट, पाहा PHOTOS
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज 4 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या भारतीय संघाची भेट घेतली. टीम इंडिया या भेटीसाठी लोक कल्याण मार्ग येथे पोहोचले होते. पाहा या क्षणाचे खास फोटो.
भारतीय क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप 2024 चा किताब जिंकून बारबाडोसवरुन मायदेशी परतले आहेत. भारतीय संघ गुरुवारी म्हणजे 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर पोहोचले. यानंतर टीम इंडिया दिल्लीच्या ITC मौर्य हॉटेलवर पोहोचले. यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टी 20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची ही भेट खास होती. पाहा या भेटीचे खास फोटो.
1/8
3/8
4/8
5/8
7/8