Mohammed Shami Daughter: मोहम्मद शमीच्या मुलीला पाहिलंत का? सोशल मीडियावर व्हायरल होतायत क्यूट फोटो

Mohammed Shami Daughter Name: न्यूझीलंडविरुद्धची एक दिवसीय मालिका भारताने 3-0 अशी जिंकली (India vs New Zealand ODI Series). या मालिकेत फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) या मालिकेत चार विकेट घेतल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. या दरम्यान शमीच्या मुलीचे (Mohammed Shami Daughter) क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल  (Photo Viral on Social Media) झाले आहेत. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) आणि त्याच्या मुलीने एका कार्यक्रमात भाग घेतला होता.

Jan 30, 2023, 19:15 PM IST
1/7

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) काही फोटो अपलोड केले आहेत. वसंती पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात हसीन आणि तिची मुलगी सहभागी झाले होते.

2/7

मोहम्मद शमीच्या मुलीचं नाव आयरा शमी (Aaira Shami) असं आहे. शमी आणि हसीन जहाँच्या भांडणावेळी आयरा खूप लहान होती. आता ती मोठी झाली आहे. पूजेच्या कार्यक्रमात आयराने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.

3/7

हसीन जहाँ हीने पिवळ्य रंगाची साडी परिधान केली होती. वसंत पंचमी आणि होळीच्या सणात पिवळ्या रंगाचं महत्त्व असतं. त्यामुळे हसीन जहाँने पिवळ्या रंगाची साडी परिधान करत या कार्यक्रमात भाग घेतला होता.

4/7

हसीन जहाँ आणि आयरा शमीने आपल्या नातेवाईकांसह हा सण उत्साहात साजरा केला. मोहम्मद शमीच्या मुलीच्या निरागसता पाहून शमीच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

5/7

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ विभक्त झाले आहेत. तर आयरा शमी ही हसीन जहाँबरोबर राहते. गेल्याचा आठवड्यात कोर्टाने मोहम्मद शमीला दरमहा 1  लाख 30 हजार रुपये हसीन जहाँला देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. यापैकी 50 हजार रुपये हसीनसाठी तर 80 हजार रुपये आयराच्या खर्चासाठी द्यावे लागणार आहेत. 

6/7

2012 च्या आयपीएल (IPL 2012) स्पर्धेत हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) चीअरलीडर्स (Cheerleader) होती. यावेळी शमीने तिला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 6 जून 2014 ला दोघांनी लग्न केलं. त्यांना आयरा नावाची मुलगी आहे.

7/7

कालांतराने शमी आणि हसीनच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हसीनने शमीवर इतर मुलींबरोबर चॅटिंग आणि आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.