Shiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?

Shiv Jayanti 2024: शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पाहिली. अशा या महाराष्ट्राला महान राष्ट करणाऱ्या छत्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्त्वाच्या लढाया माहितीयेत? 

Feb 19, 2024, 16:47 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : 'आस्ते कदम... आस्ते कदम...' असं म्हणत जेव्हा गारद दिली जाते तेव्हा, यामधून कानावर पडणारा प्रत्येक शब्द छत्रपती शिवाजी महाराज एक शासक म्हणून किती संपन्न होते याचीच प्रचिती येते. अशा या स्वराज्याच्या आणि रयतेच्या राजाची आज (19 फेब्रुवारी 2024) जयंती. 

1/11

प्रतापगडचं युद्ध

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

उपलब्ध नोंदींनुसार 10 नोव्हेंबर 1659 मध्ये साताऱ्यानजीक असणाऱ्या प्रतापगडासाठी संघर्ष झाला. मराठे आणि आदिलशाहीच्या अफजलखानामध्ये हा संघर्ष झाला होता. 

2/11

कोल्हापूरची लढाई

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

28 डिसेंबर 1659 मध्ये मराठा मावळे आणि आदिलशाहीच्या सैन्यामध्ये तुंबळ लढाई झाली होती.   

3/11

पावनखिंडीतील झुंज

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

13 जुलै, 1660 मध्ये कोल्हापुरातील विशालगडाच्या नजीक असणाऱ्या आव्हानात्मक खिंडीमध्ये आदिलशाहीच्या सिद्दी मसुदसोबत मराठ्यांच्या दलानं लढा दिला. यामध्ये वीर मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले होते.   

4/11

चाकणची लढाई

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठे आणि मुघल साम्राज्यामध्ये ही लढाई 1660 मध्ये लढली गेली.   

5/11

उंबरखिंडीतील संघर्ष

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

2 फेब्रुवारी 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वाखाली मुघलांच्या करतलब खान याच्याशी मराठ्यांनी झुंज दिली.   

6/11

सुरतची लढाई

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

5 जानेवारी 1664 मध्ये गुजरातच्या सुरतमध्ये शिवबांच्या मावळ्यांनी मुघल साम्राज्यातील इनायत खानच्या सैन्याशी लढा दिला होता.   

7/11

पुरंदरचा लढा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

1665 मध्ये मुघलांसोबत मराठ्यांची ही पुरंदरची लढाई पार पडली.   

8/11

सिंहगडाची झुंज

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

4 फेब्रुवारी 1670 मध्ये पुण्यातील सिंहगडासाची झुंज देण्यात आली. यामध्ये महाराजांच्या आशीर्वादानं मराठ्यांचं नेतृत्त्वं सुभेदार तानाजी मालुसरे यांनी केलं होतं. जिथं त्यांनी उदयभान राठोडला तगडी झुंज दिली होती.   

9/11

कल्याणची लढाई

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

1682 ते 1683 दरम्यान मुघल साम्राज्याच्या बहादुर खानानं मराठ्यांना नमवत कल्याणवर ताबा मिळवला होता.   

10/11

भूपाळगडाचं युद्ध

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

1679 मधील या युद्धामध्येही मराठ्यांना मुघलांनी पराभूत केलं होतं.   

11/11

संगमनेरची लढाई

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 shivaji maharaj wars battles in lifetime

1679 मधील संगमनेरच्या लढाईमध्ये मराठ्यांसमोर मुघल उभे ठाकले होते. उपलब्ध माहितीनुसार हे छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळातील अखेरचं युद्ध ठरलं.