अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

डॉक्टरांच्या अंतिमवर्ष परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

Jun 22, 2020, 14:13 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात डॉक्टर, निवासी डॉक्टर, पोलीस इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची आणि रुग्णांची सेवा करत आहेत. दरम्यान, 'कोविड योद्धा' असलेल्या निवासी डॉक्टरांच्या अंतिमवर्ष परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

1/5

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, वैद्यकीय आणीबाणीच्या सध्याच्या काळात निवासी डॉक्टरांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. त्यासंदर्भात या निवासी डॉक्टरांनीच सुचवलेला पर्याय मी माझ्या पत्रासोबत जोडत आहे. त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती राज्यपाल यांना मनसे कडून करण्यात आली आहे.

2/5

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

दुर्दैवाने हा निर्णय घेताना सर्वसामान्य रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध राहणा-या या २५०० निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसंच मानसिक क्षमतांचा साधा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही. 

3/5

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

आधी मे २०२०मध्ये घेण्यात येणारी त्यांची परीक्षा कोविडच्या महाभयंकर साथीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ५ जूनच्या आदेशानुसार, ही परीक्षा आता १५ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

4/5

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

एकीकडे, ते रुग्णालयांमध्ये जीवन-मृत्यूशी झुंजणाऱ्या कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचार करत आहेत, तर दुसरीकडे, सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे.   

5/5

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या आपल्या महाराष्ट्रात असून या वैद्यकीय लढाईत सुमारे २५०० निवासी डॉक्टर्स दिवस-रात्र रुग्णसेवेचं कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री व डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे हे विद्यार्थी- निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत.