'दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तो दूर राहिला लागला', ईशाने सांगितलं घटस्फोटाचं कारण

 Isha Deol Bharat takhtani Divorce: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल ही पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. या घटस्फोटाच कारण खुद्द अभिनेत्री ईशाने सांगितलं आहे. 

Feb 07, 2024, 12:45 PM IST
1/10

गेल्या काही दिवसांपासून ईशा देओलच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र त्याबद्दल कोणीही काही बोललं नव्हतं. 

2/10

12 वर्षांचा संसार मोडल्याचं ईशाने खुद्द पुष्टी दिली आहे. तेवढंच नाही तर या घटस्फोटाच कारण समोर आलं आहे. 

3/10

ईशा म्हणाली की, आमच्यामध्ये दुरावा हा खूप दिवसांपासून होता. पती भरत माझ्यापासून दूर राहत होता. 

4/10

ईशाने तिच्या अम्मा मिया पुस्तकात भरत सोबतच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. 

5/10

ईशाची दुसरी मुलगी मिरायाच्या जन्मानंतर भरत घराकडे आणि ईशाकडे दुर्लक्ष करत होत. 

6/10

ईशाच्या प्रत्येक गोष्टीवरुन तो चिडचिड करायचा. ईशाच आपल्याकडे लक्ष देत नाही असं भरत सर्वांना सांगत असे.   

7/10

ईशा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी विसरायची, असं भरतचं म्हणं असायचं. आपला शर्ट इस्त्री नाही, टूथब्रश नाही. 

8/10

एखादी बायको हे सगळं कसं विसरेल असा प्रश्न तो सतत विचारायचा. तेव्हा तिला आपल्या नात्याबद्दल शंका येऊ लागली. 

9/10

मी त्याची तक्रार दूर करण्यासाठी त्याला जास्त वेळ देऊ लागली. आम्ही फिरायला जाऊ लागलो. असं वाटलं सगळं आता सुरळीत होतं आहे. पण पुन्हा नात्यात दुरावा जाणवायला लागला. 

10/10

पण आमचं नातं पूर्वीसारखं होऊ शकत नाही, म्हणून आम्ही दोघांनी परस्पर ठरवून घटस्फोटाचा निर्णय घेतला. दरम्यान भरत यांच विवाहबाह्य संबंध होते, असा दावा सोशल मीडिया युजसने केलाय.