मुंबईच्या गर्दीत दडलंय सिक्रेट बेट; Valentine Day ला एकांत पाहिजे तर नक्की जा

मढ आयलंड हे मुंबईतील हिडन प्लेस आहे. येथे अनेक समुद्र किनारे आहेत. ज्या बद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. 

Feb 06, 2024, 23:58 PM IST

Mumbai Madh : मुंबई हे एक बेट आहे. मुंबई चारही बाजूंनी समुद्रानी वेढलेली आहे. या मुंबईत अनेक लहान बेट आहेत. असंच एक मढ आयलंड एक बेट आहे जे सिक्रेट आयलंड म्हणून ओळखले जाते. जाणून घेवूया या बेटा विषयी.

1/7

मुंबई चारही समुद्रानी वेढलेली आहे. मुंबईच्या मधोमध सिक्रेट आयलंड दडलेलं आहे. हे ठिकाण मुंबईतील हिडन प्लेस म्हणून ओळखले जाते.  

2/7

मालाड येथून तसेच वर्सेवा समुद्र किनाऱ्यावरुन जेट्टीने येथे जावे लागतले.   

3/7

मढ आयलंड असलेल्या समुद्र किनाऱ्यांबद्दल फार लोकांना माहीत नसल्यामुळे या समुद्र किनाऱ्यांना सीक्रेट बीचेस असंही म्हणतात.  

4/7

मढ चर्च आहे, किल्लेश्वर महादेव मंदिर आहे, मढ किल्ला आहे, एरंगळ नावाचं एक छोटसं गाव देखील आयलंडवर आहे.   

5/7

मढ आयलंड जवळ अक्साबीच, मार्वे हे फेमस तसेत अनेक माहीत नसलेले समुद्रकिनारे देखील आहेत.

6/7

मढ आयलंडच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेला मालाडची खाडी आहे.

7/7

मढ आयलंड असे याचे नाव आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड येथून येथे जाता येते.