Star Kids Party: स्टारकिड्सची लेट नाईट पार्टी, पाहा रात्रीच्या पार्टीत काय चालतं... Photo Viral

Star Kids Party: बॉलिवूड स्टार्स जितके लोकप्रिय आहेत तितकीच त्यांची मुलंही याबाबतीत मागे नाहीत. स्टार किड्स (Star Kids) असल्याने त्यांच्यावर कायमच कॅमेरे रोखलेले असतात. या स्टार किड्सच्या प्रायव्हेट पार्टीचे फोटोही अनेकवेळा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या पार्टीचे फोटोही व्हायरल होत असतात. अनेकवेळा या स्टारकिड्सना ट्रोल केलं जातं, पण हे स्टारकिड्स लेट नाईट पार्टीत धमालमस्ती करताना दिसतात.

Feb 18, 2023, 11:21 AM IST
1/7

स्टारकिड्सच्या लेट नाईट प्रायव्हेट पार्ट्या कायम चर्चेत असतात. त्यांच्या पार्टीचा माहोलही वेगळाच असतो. या लेट नाईट पार्टीत (Late Night Party) सध्या चर्चा असते ती न्यासा देवगनची (Nysa Devgan). काही दिवसांपूर्वीच एका पार्टीतले तीचे फोटो व्हायरल झाले होते, यात ती चालताना अडखळत होती, त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली होती.

2/7

अभिनेत्री जान्हवी कपूरची लहान बहिण खुशी कपूरपासून (Khushi Kapoor) अर्जुन कपूरची मुलगी माहिका रामपाल अशा अनेक जणी लेटनाईट पार्टीत दिसत असतात. या पार्टीचे फोटोही ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) शेअर करतात. 

3/7

लेट नाईट पार्टीत सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही (Ibrahim Ali Khan) अनेकवेळा दिसतो. एका फोटोत तो पूजा बेदीची मुलगी आणि अभिनत्री अलायाबरोबरच चिल करताना दिसत आहे. 

4/7

संजय कपूरची मुलीग शनाया कपूर (Shanaya Kapoor) लाईम लाईटमध्ये नसली तरी लेट नाईट पार्टीत मात्र कायम असते. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिचा भाऊ आर्यनही (Aryan Khan) स्टारकिड्सच्या पार्टीत अनेकवेळा स्पॉट झालेत.

5/7

बॉलिवूडीच बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकरही (Bhoomi Pednekar) स्टारकिड्सच्या पार्टीत दिसते. काही दिवसापूर्वीचा पार्टीतला तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

6/7

खुशी कपूर आपल्या मित्रांबरोबर नेहमीच धमाल करताना दिसते. खुशी कपूरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झालेली नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

7/7

बॉलिवूड अभिनेता अर्जन रामपालच्या मुलीला फार कमी जण ओळखत असले तरी ती देखील आपल्या मित्रांबरोबर लेट नाईट पार्टीत एन्जॉय करताना दिसते.