‘दिलरुबा’ वादकाने तीन मुलांना दिले संगीत प्रशिक्षण, दोन फ्लॉप ठरले तिसरा बनला पंकज उधास!

जेष्ठ गझलकार आणि पार्श्वगायक पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उधास यांची कारकीर्द जाणून घेऊया.

| Feb 26, 2024, 18:00 PM IST

Pankaj Udhas: जेष्ठ गझलकार आणि पार्श्वगायक पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उधास यांची कारकीर्द जाणून घेऊया.

1/7

‘दिलरुबा’ वादकाने तीन मुलांना दिले संगीत प्रशिक्षण, दोन फ्लॉप ठरले तिसरा बनला पंकज उधास!

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

जेष्ठ गझलकार आणि गायक पंकज उधास यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. पंकज उधास यांची अनेक गाणी अजरामर ठरली आहेत. पंकज यांचा जन्म गुजरातच्या जेतपुरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव केशुभाई उधास तर आईचे नाव जितुबेन उधास आहे. 

2/7

वडिल सरकारी कर्मचारी

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

पंकज उधास यांचे वडिल केशुभाई हे सरकारी कर्मचारी होती. एकदा त्यांची ओळख प्रसिद्ध वीणा वादक अब्दुल करीम खान यांच्यासोबत झाली. त्यांनी त्यांच्याकडून दिलरुबा नावाचे वाद्य शिकले होते. 

3/7

दिलरूबा नावाचे वाद्य

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

पंकज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडिल मोठ्या आवडीने दिलरूबा नावाचे वाद्य वाजवायचे. हळूहळू पंकज यांच्यासह त्यांच्या दोघा भावांनाही संगीतात रुची निर्माण झाली. पंकज यांचे भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हेदेखील गायक आहेत.

4/7

संगीत अकादमी

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांनी तिन्ही मुलांना राजकोट येथील संगीत अकादमीत शिक्षणासाठी पाठवले. पंकज उधास हे सुरुवातीला तबला वादन करायचे. मात्र, त्यानंतर गुलाम कादिर खान साहब यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर उधास ग्वालियर घराण्याचे गायक नवरंग नागपुरकर यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. 

5/7

पहिले गाणे

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

 पंकज उधास यांनी चित्रपट कामनासाठी पहिले गाणे गायले होते. चित्रपट जरी फ्लॉप ठरला तरी त्यांच्या गाण्याची खूप तारीफ झाली. गझल गायकच्या रुपात करियर घडवण्यासाठी त्यांनी उर्दू शिकली. त्यानंतर देश-विदेशात त्यांनी गझल संगीताचे कार्यक्रम केले. 

6/7

पहिला म्युझीक अल्बम

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

1980 मध्ये त्यांचा पहिला म्युझीक अल्बम आहट रिलीझ झाला होता. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले. 2011 पर्यंत त्यांनी 50हून अधिक अल्बम आणि शेकडो अल्बमचे संकलन केले.

7/7

पद्मश्री

Pankaj Udhas renowned Ghazal singer, passes away know his filmy carrer

पंकज उधास यांचे चांदी जैसा रंग हे तेरा, सोने जैसे बाल, चिठ्ठी आई है यासारखी अनेक गाणी लोकप्रिय ठरली. पंकज उधास यांना भारतातील चौथ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीने सन्मानिक करण्यात आले आहे.