विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

Pravin Dabholkar | May 31, 2024, 18:52 PM IST

Vitthal Mandir basement: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

1/12

विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS

Pandharpur Vitthal Mandir Talghar Prachin Murty

पंढरपूर विठ्ठल मंदिरात पुरातन ठेवा सापडलाय.

2/12

विष्णु बालाजी रुपातील मूर्ती सापडल्या आहेत.

3/12

गाभा-यासमोरील दगड बाजुला करताना तळघर सापडलं.

4/12

त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे अधिका-यांनी तळघर उघडून आत प्रवेश केला.

5/12

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. 

6/12

त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडली.

7/12

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात सापडलेल्या तळघरातून काही भग्नमूर्ती भग्नपादुका या बाहेर काढण्यात आलेले आहेत

8/12

 त्यात या मूर्ती साडपल्या आहेत तर पादुकाही सापडल्या आहेत.

9/12

पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते. 

10/12

यावेळी या मुर्ती बाहेर काढण्यात आल्या.

11/12

या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. 

12/12

पुरातत्व विभागाच्या संशोधनात आणखी महत्वाची माहिती समोर येणार आहे.