सेम चेहरा सेम आवाज, हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते पाकिस्तानची ही बिझनेसवुमन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे चाहते जगभरात आहेत. पण पाकिस्तानात एक अशी बिझनेसवुमन आहे जी हुबेहूब  ऐश्वर्या राय सारखी दिसते. या पाकिस्तानी बिझनेसवुमनचे नाव कंवल चीमा माई असून ती इम्पॅक्ट मीटरची फाउंडर आहे. 

| Oct 14, 2024, 18:57 PM IST
1/7

कंवल चीमा ही पाकिस्तानमधील एक बिझनेसवुमन असून तिचा आवाज आणि चेहरा हुबेहूब बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसते. तिने अधिकतर आयुष्य अमेरिका आणि रियादमध्ये घालवलं असून तिचे फोटो पाहून सर्वच हैराण होतात. 

2/7

कंवल चीमा डिजिटल प्लॅटफॉर्म इम्पॅक्ट मीटरची (MIM) फाउंडर आणि सीईओ आहे. याशिवाय ती पाकिस्तान एंतरप्रेन्योर्स ऑर्गनाइजेशनची अध्यक्ष सुद्धा आहे. 

3/7

कंवल चीमाचा जन्म हा पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झाला असून त्यानंतर ती तिच्या पालकांसह सौदी अरेबियाची राजधानी रियाध शहरात राहायला गेली.   

4/7

कंवल चीमाने सुरुवातीचे शिक्षण पाकिस्तानमध्ये घेतले आणि इयत्ता दुसरी नंतर आठवी पर्यंतच शिक्षण रियाद येथे घेतलं.  अमेरिकन आणि ब्रिटिश शाळेत तिचं शिक्षण झालं असून त्यानंतर उर्वरित उच्च शिक्षण तिने पाकिस्तानात येऊन घेतलं. 

5/7

एकदा पाकिस्तानी रिपोर्टरने कंवल चीमा हिला प्रश्न विचारला होता की तिची तुलना हे अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत केली जाते. तुझा आवाज आणि चेहरा सुद्धा हुबेहूब तिच्याशी मिळत जुळता आहे. पण यावर कंवल चीमाने नकार दिला होता. 

6/7

तिने म्हंटले की, 'मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही'. हसतपणे कंवल चीमानेयावर बोलणं टाळलं पण तिच्या जवळच्या लोकांच्या सांगण्यानुसार तिला ऐश्वर्या राय सोबत होणारी तिची तुलना अजिबात आवडत नाही.   

7/7

कंवल चीमाने एकदा सांगितले होते की, तिने तिच्या करिअरमध्ये जे काही केलंय यात तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी खूप मदत केली आहे.