लोकसभा निवडणुकीला अवघे 11 महिने शिल्लक;भाजपचा मेगा प्लॅन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 जुलैला मंत्री परिषदेची बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्रातल्या हालचालींना वेग आला आहे.
BJP Mega Plan : 2024 लोकसभा निवडणुकीला अवघे 11 महिने शिल्लक आहेत. केंद्रातल्या विरोधकांनी एकीकडे भाजपला रोखण्यासाठी जुळवाजुळव सुरु केलीय तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी निवडणुकांच्या मायक्रो मॅनेजमेंटसाठी मेगा प्लॅनची तयारी केली आहे. रणनीती आखण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय संघटन महासचिव बीएल संतोष उपस्थित होते.



