Photos: 'एक रात्रही...', 20 वर्षीय खेळाडूला Olympics मधून हाकललं; म्हणाले, 'तिच्यामुळे संघात अयोग्य...'

20 Year Old Athlete Kicked Out Of Olympic By Team: पात्रता फेरीतील सहभाग, अचानक निवृत्ती अन् मग त्यानंतर उडालेला गोंधळ या साऱ्या पार्श्वभूमीवर आता संघाने एक पत्रकच जारी केलं असून या हकालपट्टीची अधिकृतपणे घोषणा केली आहे. जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय आणि या तरुणीने नक्की केलं तरी काय...

Swapnil Ghangale | Aug 07, 2024, 16:03 PM IST
1/12

Luana Alonso Olympic Instagram

तिच्या कामगिरीपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टची अधिक चर्चा राहिली. मात्र या पोस्टमुळे नाही तर अगदीच वेगळ्या कारणाने तिची हकालपट्टी झाली आहे. नेमकं प्रकरण काय? ही तरुण खेळाडू कोण ते जाणून घेऊयात...

2/12

Luana Alonso Olympic Instagram

ऑलिम्पिकदरम्यान लुआनाने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिच्या देशाच्या संघासोबत राहू नये असे आदेश देण्यात आले आहेत.

3/12

Luana Alonso Olympic Instagram

पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर बंदी घालण्यात आली आहे. लुआना अलोन्सो असं या तरुणीचं नाव असून ती पॅराग्वे देशाची जलतरणपटू आहे.    

4/12

Luana Alonso Olympic Instagram

लुआनाने तिच्या वागणुकीच्या माध्यमातून 'अयोग्य वातावरण' निर्माण केल्याचा आरोप झाल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  

5/12

Luana Alonso Olympic Instagram

पॅराग्वेची ही 20 वर्षीय जलतरणपटू अलीकडेच झालेल्या महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये शेवटच्या स्थानावर राहिली. तिच्या कामगिरीपेक्षा तिच्या पॅरीस ऑलिम्पिकदरम्यानच्या सोशल मीडियावरील पोस्ट अधिक चर्चेत राहिल्या.

6/12

Luana Alonso Olympic Instagram

अमेरिकेच्या टोरी हस्केने लुआना अलोन्सो सहभागी झालेल्या 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं तर अमेरिकेच्याच ग्रेचेन वॉल्शने रौप्यपदकावर नाव कोरलं.चीनच्या झांग युफेई तिसऱ्या स्थानी राहिली.  

7/12

Luana Alonso Olympic Instagram

पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा लॅरिसा शेरर यांनी लुआना अलोन्सो राष्ट्रीय संघापासून वेगळी झाल्याच्या आणि ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देणारं एक निवेदनच जारी केलं आहे.  

8/12

Luana Alonso Olympic Instagram

लॅरिसा यांनी आपल्या निवेदनात,"लुआना अलोन्सोच्या उपस्थितीमुळे पॅराग्वेच्या संघात अयोग्य वातावरण निर्माण झालेलं. तिला देण्यात आलेल्या आदेशानुसार ती निघून गेली यासाठी आम्ही तिचे आभार मानतो. ॲथलीट्सच्या व्हिलेजमध्ये संघासोबत एक रात्रही न थांबण्याचा निर्णय तिने स्वच्छेने घेतला होता," असं सांगितलं आहे.

9/12

Luana Alonso Olympic Instagram

अवघ्या 20 वर्षीय लुआना अलोन्सोने पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान अचानक स्विमिंगमधून निवृत्तीची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली होती.  

10/12

Luana Alonso Olympic Instagram

यापुढे आपण स्विमिंगच्या खेळात सहभागी होणार नाही असं लुआना अलोन्सोने जाहीर केलेलं.  

11/12

Luana Alonso Olympic Instagram

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्विमिंगच्या उपांत्य फेरीतील पात्रता फेरीमध्ये अवघ्या 0.24 सेकंदांनी पराभूत होत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर लुआना अलोन्सोने निवृत्ती जाहीर केली होती.   

12/12

Luana Alonso Olympic Instagram

इंस्टाग्रामवरुन लुआना अलोन्सोने निवृत्तीची घोषणा केलेली. “मी निवृत्त होतेय हे आता अधिकृतपणे सांगते आहे. पाठिंब्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार! पॅराग्वेच्या चाहत्यांनी मला माफ करावे. मला फक्त तुमचे आभार मानायचे आहेत!” असं लुआना अलोन्सोने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.