ऑफिसमध्ये अफेअर असणे योग्य? 50% करतात फ्लर्ट तर 57% लोकांचे...' आकडेवारी आली समोर

65 टक्के लोकांना ऑफिसमध्ये अफेअर ठेवून आनंद मिळतो. सारखे काम करणाऱ्यांसोबत अफेअर करणे योग्य निर्णय असल्याचे 59 टक्के लोकांना वाटतं.

Pravin Dabholkar | Jan 30, 2024, 15:02 PM IST

Office Romantic Relationship:65 टक्के लोकांना ऑफिसमध्ये अफेअर ठेवून आनंद मिळतो. सारखे काम करणाऱ्यांसोबत अफेअर करणे योग्य निर्णय असल्याचे 59 टक्के लोकांना वाटतं.

1/11

ऑफिसमध्ये अफेअर असणे योग्य? 50% करतात फ्लर्ट तर 57% लोकांचे...' आकडेवारी आली समोर

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

Office Affaire: कॉलेज संपल्यानंतर मित्र-मैत्रिणींचा घोळका, नातं आपल्या आयुष्यातून निघून जात, सर्वजण 10 ते 6 अशा ऑफिसच्या कामात व्यस्त होतात. लग्न करतात आणि संसाराला लागतात. 

2/11

फोर्ब्सची आकडेवारी

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

पण ऑफिसमध्ये अफेअर असणारे किती टक्के लोक आहेत? कितीजण ऑफिसमध्ये फ्लर्ट करतात? किती जणांचे ब्रेकअप होतात? यासंदर्भातील फोर्ब्सची आकडेवारी समोर आली आहे. 

3/11

लव्हस्टोरी

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

100 पैकी 60 ऑफिस कर्मचाऱ्यांची ऑफिसमध्ये कुठेतरी लव्हस्टोरी सुरु असते. यापैकी 40% प्रेमसंबंध त्यांच्या जोडीदार किंवा प्रियकरांना फसवून गुप्तपणे सुरु असतात. 'फोर्ब्स ॲडव्हायझर'च्या ताज्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. 

4/11

ऑफिसला जायला मजा येते

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

50 टक्के कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी फ्लर्ट करतात. अफेअर असल्यास ऑफिसला जायला मजा येते असे 38 टक्के लोकांना वाटतं.

5/11

कामानंतर पुरेसा वेळ

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

सर्वेक्षण केलेल्या 2000 लोकांपैकी 61% लोकांनी कबूल केले की, आमच्याकडे जोडीदार शोधण्यासाठी कामानंतर पुरेसा वेळ नसतो. यामुळे आम्ही ऑफिसमध्येच प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो, अशी कबुली त्यांनी दिली आहे. 

6/11

अफेअर ठेवून आनंद

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

65 टक्के लोकांना ऑफिसमध्ये अफेअर ठेवून आनंद मिळतो. सारखे काम करणाऱ्यांसोबत अफेअर करणे योग्य निर्णय असल्याचे 59 टक्के लोकांना वाटतं.

7/11

बिंधास्तपणे बोलतात

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

62 टक्के लव्हबर्ड्स आपल्या प्रेमाविषयी बिंधास्तपणे एचआरलाही सांगतात.41 टक्के लोक ती/तो काय बोलेलं? लोक काय बोलतील म्हणून आपले प्रेम जाहीर करत नाहीत.

8/11

अनप्रोफेशनल

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

ऑफिसमध्ये रोमॅंटिक नातं ठेवणं हे अनप्रोफेशनल असल्याचे 5 पैकी एका कर्मचाऱ्याला वाटते. यामुळे कामावर परिणाम होतो, असे 57 टक्के लोकांना वाटतं. 54 टक्के लोकांच्या कामावर यामुळे परिणाम झाला आहे.

9/11

पर्सनल स्पेस संपली

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

अफेअरमुळे 51 टक्के लोकांचे प्रोफेशनलिझ्म संपलाय. ऑफिस रोमान्समुळे 50  टक्के लोकांची पर्सनल स्पेस संपली आहे.

10/11

अफेअरमुळे ऑफिसच्या इतर कर्मचाऱ्यांचा बघायचा दृष्टीकोन बदलल्याचे 52 टक्के लोकांना वाटते.

11/11

चुगल्या

Office Romantic Relationship Affect on Work Efficiency Forbes Advisor Survey

लोक चुगल्या खूप करतात असे 49 टक्के लोकांना वाटतं. तर रिलेशनशिपमध्ये गेल्यामुळे सहकारी ईर्ष्या करतात असे 33 टक्के लोकांना वाटतं.