ऋषी कपूर यांच्याशी कसं होतं नातं; नीतू कपूर यांनी कित्येक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाल्या 'इतका स्ट्रिक्ट आणि पजेसिव्ह....'

नीतू कपूर यांनी नुकतीच कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपले पती दिवंगत ऋषी कपूर यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. ते फार स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड होते असं त्यांनी सांगितलं.   

Jan 11, 2024, 19:30 PM IST
1/10

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. याचमुळे त्या चाहत्यांच्याही फेव्हरेट आहेत.   

2/10

नीतू कपूर यांनी नुकतीच कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपले पती दिवंगत ऋषी कपूर यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. ते फार स्ट्रिक्ट आणि पजेसिव्ह बॉयफ्रेंड होते असं त्यांनी सांगितलं.   

3/10

ऋषी कपूर आपल्याला जास्त पार्टी करु देत नसत असंही त्यांनी सांगितलं.   

4/10

आम्ही फार चांगला वेळ एकत्र घालवला आहे. खासकरुन यशजींसोबत. आम्ही रात्री पार्टी करायचो, अंताक्षरी खेळायचो.   

5/10

ती वेळ एखाद्या पिकनिकप्रमाणे असायची. पण नंतर ऋषी कपूर माझे प्रियकर झाले आणि मी जास्त पार्टी करु शकायची नाही.   

6/10

कारण ते नेहमी सांगायचे, हे करु नको, ते करु नको, घरी ये. त्यामुळे त्या पार्टींची वाइल्ड बाजू मी पाहूच शकले नाही.   

7/10

मी कमिटेड होती. माझी आई आणि प्रियकर दोघेही स्ट्रिक्ट होते. यामुळे मी नेहमीच दोघांमध्ये अडकलेली असायची असं त्यांनी सांगितलं.   

8/10

1979 मध्ये साखरपुडा करण्याआधी नीतू कपूर आणि ऋषी कपूर बराच काळ प्रेमसंबंधात होते.   

9/10

1980 मध्ये लग्न झाल्यानंतर नीतू कपूर अभिनयापासून दूर गेल्या.   

10/10

2020 मध्ये ऋषी कपूर यांचं कॅन्सरमुळे निधन झालं.