2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
1/10
आल्फा
यशराज फिल्म्सचा आगामी चित्रपट 'अल्फा' हा 25 डिसेंबर 2025ला प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट आणि शर्वर वाघ या चित्रपटात मुख्य भूमीका साकारणार आहेत. शिव रावल निर्देशित हा चित्रपट पहिला महिला केंद्रित 'स्पाय युनिव्हर्स' चित्रपट आहे. आल्फामध्ये पहिल्यांदाच दोन महिला स्पाय एजंट्सची प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
2/10
छावा
लोकप्रिय अभिनेता विक्की कौशल लवकरच 'छावा' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुष्पा 2 सोबत प्रदर्शित केला जाणार होता, पण आता छावा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. हा 'मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज' यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. फक्त विक्की कौशलच नाही तर अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना सुध्दा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
3/10
Emergency
कंगना राणवतचा Emergency हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच याच्या वादग्रस्त पटकथेमुळे चर्चेत होता. हा चित्रपट सप्टेंबर 2024ला प्रदर्शित केला जाणार होता, पण आता हा चित्रपट 17 जानेवारी 2025 ला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगना पूर्व प्रधानमंत्री 'इंदिरा गांधी' यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1975 ते 1977 दरम्यान लावलेल्या आणीबाणी आणि त्याच्या परिणामांवर आधारित असून कंगनानेच याची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात कंगनासोबत अनुपम खैर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशीक सुध्दा दिसणार आहेत.
4/10
Game Changer
5/10
कांतारा: चेप्टर.1
हृषभ शेट्टी अभिनित 'कांतारा: चेप्टर 1' लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कर्नाटक येथील उत्तर कन्नड क्षेत्रातील कदंब राजवंशाच्या शासनकाळावर आधारित आहे. यांचाच 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा चित्रपट सुध्दा खूप गाजला होता. आता 'कांतारा: चेप्टर 1' हा पौराणिक चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे.
6/10
सिकंदर
7/10
सितारे जमीन पर
आमिर खानचा पुढचा चित्रपट 'सीतारे जमीन पर' 2025 ला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वल आहे. मात्र, या चित्रपटात आधीच्या कथेतील पात्र नसल्याचं आमिरने सांगितलं आहे. आमिरने 'तारे जमीन पर' चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण केले आणि त्याचे खूप कौतुक झाले. आता त्याच्या सिक्वलला चाहते कसा प्रतिसाद देतील हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
8/10
सनी संस्कारी की तुलसी कुमारी
जाह्नवी कपूर, वरुण धवन, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' पुढील वर्षी रिलिझ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या वर्षात 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
9/10