मुंबई लोकलमधील पीक अवर्सचा त्रास संपणार, काय आहे मध्य रेल्वेचा फ्लेक्सी प्लान?

Mumbai local: मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन कामकाजासाठी 2 स्लॉट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Pravin Dabholkar | Oct 29, 2023, 06:38 AM IST

Mumbai local Peak Hours Problem:पीक अवर्स स्किमचा फायदा मुंबई लोकलच्या प्रवाशांना होणार आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांना दररोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.

1/10

मुंबई लोकलमधील पीक अवर्सचा त्रास संपणार, काय आहे मध्य रेल्वेचा फ्लेक्सी प्लान?

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

Mumbai Local Flexi Plan: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. असे असले तरी सकाळ आणि संध्याकाळच्या ठराविक वेळेत ही गर्दी जास्त असते. याला पीक अवर्स म्हणतात. या पीक अवर्स संदर्भात मध्य रेल्वेने खास योजना आणली आहे. 

2/10

प्रचंड गर्दीचा सामना

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

पीक अवर्स स्किमचा फायदा मुंबई लोकलच्या प्रवाशांना होणार आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांना दररोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.

3/10

सरासरी 4 हजार लोकांचा प्रवास

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

या गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमध्ये सरासरी 4 हजार लोक प्रवास करतात. मध्य रेल्वे असो वा पश्चिम रेल्वे किंवा हार्बर लाईन तिन्ही मार्गावर यावेळात गर्दी असते. सकाळी मोठ्या संख्येने गर्दी सीएसएमटीच्या दिशेने येते. तर संध्याकाळी ही गर्दी मोठ्या संख्येने परत फिरते. 

4/10

फ्लेक्सी स्कीम

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

पीक अवर्सचा त्रास दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'फ्लेक्सी स्कीम' आणली आहे.

5/10

फ्लेक्सी स्कीम

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन कामकाजासाठी 2 स्लॉट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला स्लॉट सकाळी 9:30 ते 17:45 पर्यंत आणि दुसरा स्लॉट सकाळी 11:30 ते 19:45 पर्यंत असेल. 

6/10

योजना १ नोव्हेंबरपासून लागू

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

कर्मचाऱ्यांसाठी हे स्लॉट मुंबई विभागात उपलब्ध असतील. ही योजना १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे मुंबई लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 

7/10

दोन स्लॉटमधून निवड

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

कर्मचाऱ्यांना दोन स्लॉटमधून निवड करण्याचा पर्याय दिला जाईल. एकदा पर्याय निवडल्यानंतर तो संपूर्ण महिन्यासाठी लागू होईल, महिन्याच्या मध्यात तो बदलता येणार नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. 

8/10

इतर कर्मचाऱ्यांसाठीही लागू

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

मुंबई विभागातील डीआयएम कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  ही योजना यशस्वी झाली तर ती नंतर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली जाणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. 

9/10

यापूर्वीही ही योजना लागू

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

यापूर्वीही ही योजना लागू करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावा दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत मध्य रेल्वेने त्यांना त्यांच्या घराजवळ काम करण्याचा पर्याय दिला होता. यानंतर काही कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी स्कीमही देण्यात आली. यामुळे ट्रेनमध्ये आणि नंतर ऑफिसमध्येही गर्दी टाळता आली.

10/10

कितपत यशस्वी होते?

Mumbai local peak hours Problem will end Central Railways flexi plan

मुंबईतील पीक अवर्सच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनेही अशी योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता मध्य रेल्वेने उचललेले पाऊल कितपत यशस्वी होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.