तुमचे सिमकार्ड बनावट?, तब्बल 30 लाख सिमकार्ड बोगस

Mumbai Crime News : तब्बल 30 लाख सिमकार्ड बनावट. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Surendra Gangan | May 14, 2023, 09:41 AM IST
1/6

Fake SIM Cards : भारतात तब्बल 30 लाख सिमकार्ड बनावट असल्याचं उघड झालंय. यापैकी मुंबईत 30 हजार तर तामिळनाडूत 55 हजार सिमकार्डचा समावेश आहे. 

2/6

 मुंबईत बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध 5 गुन्ह्यात तब्बल साडेआठ हजारांहून अधिक बनावट सिमकार्ड बनवल्याचं उघड झाले आहे. 

3/6

पोलिसांनी 13 जणांना अटक केलीय. मिरारोडमधल्या एका कॉल सेंटरमधून 52 सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. मुंबईत कारवाई सुरुच आहे. केंद्राने ही माहिती दिल्यावर मुंबई पोलीस तातडीने कामाला लागलेत.

4/6

या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या तपासादरम्यान, मुंबईजवळील मीरा रोड परिसरात सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरला एका व्यक्तीने काही सिमकार्ड दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून तेथून 52 सिमकार्ड जप्त केली.

5/6

दरम्यान, एक फोटो वापरुन तब्बल 685 सिम कार्ड बनविण्यात आली होती. व्हीपी रोड पोलिसांनी विशाल शिंदे (33) नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे.  त्याने त्याचा फोटो वापरुन 378 सिमकार्ड बनवली होती. 

6/6

मुंबईच्या डीबी मार्ग पोलिसांनी अब्दुल शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली, त्याने त्याचा फोटो वापरुन 190 सिमकार्ड दिल्याचे उघड झाले आहे. मलबार हिल पोलिसांनी अटक केलेला आरोपी यात प्रमुख होता. अब्दुल मन्सूरी असे त्याचे नाव असून त्याने त्याचा फोटो वापरुन तब्बल 685 सिमकार्ड जारी करण्यात आली आहेत.