Moong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन

Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. 

May 12, 2023, 10:49 AM IST

Moong Dal Diet Plan For Weight Loss: आज प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाला आहे. प्रत्येकाला वाटतं आपली शरीरयष्टी सुंदर आणि आकर्षक असावी. तरूणींना वाटतं आपणही करीना, दीपिका आणि मलायकासारखं दिसावं. तर तरुणांना वाटतं आपली बॉडी बॉलिवूडमधील हिरोसारखी दिसावी. पण जिम आणि डाएट फॉलो करुनही अपेक्षित वजन कमी होतं नाही. 

1/10

10 दिवसात 5 किलो वजन कमी

आहार तज्ज्ञांनी झपाट्याने वजन कमी करण्यासाठी मूग डाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. या प्लॅननुसार तुम्ही 10 दिवसात 5 किलो वजन कमी करु शकता. 

2/10

मूग डाळ डाएटची सुरुवात

सकाळी उठल्यावर दोन ग्लास गरम पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यानंतर योगा, चालणे किंवा प्राणायाम नक्की करा.   

3/10

पहिले तीन दिवस

दिवसातून 6 वेळा मूग डाळ सूप प्या. लसून, आले, मीठ हिंग, जिरे, बडीशेप, धणे आणि हिरवी मिरची घालून मूगडाळ शिजवून घ्या.   

4/10

अशक्तपणा जाणवत असेल तर...

पहिल्या दिवशी सूपचं सेवन करु अशक्तपणा जाणवत असेल तर दुसऱ्या दिवशी सूपचं प्रमाण वाढवा. 

5/10

ही लक्षणं दिसल्यास घाबरू नका

तुम्हाला मळमळ, हलकी डोकेदुखी होऊ शकते. ही लक्षणं दिसल्यास घाबरु नका कारण तुमची बॉडी डिटॉक्स होतेय असं आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

6/10

हे खाणं टाळा!

मूगडाळ डाएट प्लॅन फॉलो करत असताना टोमॅटो, लिंबू आणि दही हे पदार्थ खाऊ नका. तेल किंवा तूपाचं सेवन करु नका. 

7/10

चहा आणि कॉफी घेऊ शकता

मूगडाळ सूपाशिवाय तुम्ही साखरविरहित चहा कॉफी घेऊ शकता. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या. 

8/10

पुढील 5 दिवसांच्या डाएट

सकाळी उकडलेल्या भाज्या खा. दुपारी मूगडाळीचं सूप प्या. संध्याकाळी आणि रात्रीच्या जेवणातही सूप घ्या.   

9/10

शेवटच्या दोन दिवसांचा डाएट

शेवटच्या दोन दिवसांमध्ये तुम्ही मूगडाळ चीला खाऊ शकता. चीला बनवताना त्यात मिरची, कांदा, आले, टोमॅटो, मीठ घाला. त्यानंतर तव्याला गाईचं तूप लावून चीला बनवा. दिवसातून 3 वेळा एक एक चीला खा. 

10/10

10 दिवसांनंतर...

मूगडाळ डाएट प्लॅन 10 दिवस फॉलो केल्यानंतर हळूहळू आणि हलका आहार सुरु करा.