इंटरनेट सर्चिंगमध्ये 'आत्मनिर्भर' भारत; Google Chrome, Mozilla Firefox टक्कर देणार मोदी सरकारचे ब्राउजर

लोकसभेत नुकतचं वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक अर्थात Data protection Bill मंजूर झाले आहे. यानंतर आता सरकार   Atmanirbhar Browser लाँच करणार आहे. 

Aug 10, 2023, 16:34 PM IST

Atmanirbhar Browser:  आता  इंटरनेट सर्चिंगमध्ये देखील भारत 'आत्मनिर्भर'  होणार आहे. कारण Google Chrome, Mozilla Firefox टक्कर देण्यासाठी मोदी सरकार भारतीय Atmanirbhar Browser लाँच करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारतातील नागरिकांची डिजीटल प्रायव्हसी यासाठी भारत सरकार Atmanirbhar Browser लाँच करत आहे. यामुळे भारतीयांना स्वदेशी Atmanirbhar Browser वर इंटरनेट सर्फिंग करता येणार आहे.

 

 

1/7

जगभरात इंटरनेट सर्चिंगसाठी Google Chrome, Mozilla Firefox, Microsoft Edge, Opera सारख्या Browser चा वापर केला जातो. भारत सरकार या Browser ना टक्कर देण्यासाठी स्वत:चे Browser लाँच करणार आहे. 

2/7

आकडेवाडीनुसार 850 मिलियन यूजर्स भारतात इंटरनेट Browser वापरतात. जगभरात Google Chrome ची 88.47 हिस्सेदारी आहे. यामुळे Atmanirbhar Browser Google Chrome ची मक्तेदारी मोडित काढू शकतो. 

3/7

राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारतातील नागरिकांची डिजीटल प्रायव्हसीकरिता Atmanirbhar Browser अधिक सुरक्षित ठरु शकते.

4/7

google play store प्रमाणे भारताच्या Atmanirbhar Browser मध्ये देखील play store प्रमाणे ऑप्शन दिला जाणार आहे. 

5/7

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि त्यांच्या संबंधित विभागांकडून Atmanirbhar Browser चे निरीक्षण केले जाणार आहे. 

6/7

Atmanirbhar Browser डेव्हलप करण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

7/7

Atmanirbhar Browser असे या भारतीय वेब Browser चे नाव असणार आहे. 2024 मध्ये हे भारतीय Browser लाँच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.