Miss Universe 2023 : भारताची दिविता राय बनली ‘सोने की चिडिया’, मिस युनिव्हर्स स्पर्धेत घातला अनोखा पोशाख, पाहा Exclusive Photo
भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविता राय ही कर्नाटकातील 25 वर्षीय मॉडेल आहे. तिने या स्पर्धे आपल्या वेशभूषेने सर्वांची मने जिंकली. नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये दिविता 'सोने की चिडिया'च्या अवतारात स्टेजवर उतरली आहे.
Miss Universe 2023: मिस युनिव्हर्स 2023 या स्पर्धेत कर्नाटकातील 25 वर्षीय दिविता राय भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स शहरात पार पडत आहे. नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये दिविता रायने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सोनपरी अंदाजात दिसली. सोने की चिडिया अशी दिविताच्या कॉस्ट्यूमची थीम होती. यंदा मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत कर्नाटकातील मॉडेल दिविता रायच्या हाती भारताची कमान आहे.



