स्त्री-पुरुषांनी 'अशी' ओळखा आपली प्रजनन क्षमता, वेळेआधी चाचण्या केल्याचे काय फायदे?

  तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये या चाचण्यांचा समावेश केल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती मिळेल जेणेकरुन तुम्हाला कुटुंब नियोजन आणि प्रजननाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास होईल.

Pravin Dabholkar | Jan 09, 2024, 11:14 AM IST

Men and women fertility:  तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये या चाचण्यांचा समावेश केल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती मिळेल जेणेकरुन तुम्हाला कुटुंब नियोजन आणि प्रजननाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास होईल.

1/14

स्त्री-पुरुषांनी आपली प्रजनन क्षमता कशी ओळखायची? वेळेआधीच करा 'या' चाचण्या

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

पारंपारिक पध्दतीत आरोग्य तपासणीमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी यासारख्या सामान्य चाचण्यांचा समावेश असतो आणि यांच्या मापदंडांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.मात्र याव्यतिरिक्त काही अशा चाचण्या आहेत ज्या वेळीच करणे गरजेचे आहे.

2/14

प्रजनन चाचणी

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

प्रजनन चाचण्या ही स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये या चाचण्यांचा समावेश केल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती मिळेल जेणेकरुन तुम्हाला कुटुंब नियोजन आणि प्रजननाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास होईल.

3/14

ओव्हुलेशन मॉनिटरिंग

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

ओव्हुलेशनची नियमितता आणि अंदाज समजून घेणे ही महिला प्रजननक्षमतेचे मूल्यांकन गरजेचे आहे. ओव्हुलेशन प्रेडिक्टर किट वापर केल्यास स्त्रियांना त्यांचा प्रजननाचे योग्य दिवस ओळखण्यात मदत होते.

4/14

संप्रेरक पातळी

संप्रेरक चाचण्या, ज्यामध्ये फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), ल्युटेनिझिंग हार्मोन (LH), इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा समावेश आहे. प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हार्मोनल संतुलनाविषयी माहिती मिळते. संपूर्ण मासिक पाळीत हार्मोनल पातळीत चढ उतार पहायला मिळतो. 

5/14

तीन महत्त्वाचे टप्पे

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

मासिक पाळीचे टप्पे महिलेला साधारण 23 ते 38 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते. त्यामध्ये फॉलीक्युलर फेज(Follicular Phase), ओव्ह्युलेशन (Ovulation) आणि ल्यूटल फेज (Luteal Phase) हे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. फॉलिक्युलर फेज तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. या काळात महिलांच्या शरीरामध्ये सर्वांत कमी हॉर्मोन्सची पातळी असते. शिवाय या फेजमध्ये सेक्स हार्मोन्सची पातळी कमी असल्यामुळे स्त्रीचं शरीर एखाद्या पुरुषी शरीराच्या स्थितीप्रमाणं असतं. 

6/14

गर्भधारणेची शक्यता जास्त

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसानंतर पाच ते सहा दिवस फॉलिक्युलर फेज सुरू राहून ती 12 ते 14 दिवस टिकते. मासिक पाळीनंतर इस्ट्रोजेन हळूहळू वाढते परिणामी ल्युटेनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे मिड सायकल ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन हा दुसरा टप्पा आहे. ओव्हुलेशन काळात महिलांच्या शरीरातून एग्ज रिलिज होतात. या काळात गर्भधारणा (Pregnancy) होण्याची सर्वांत जास्त शक्यता असते.

7/14

ओवेरियन रिझर्व

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

ओवेरियन  रिझर्व बाबतीत जर एखादी स्त्री लगेच गर्भधारणेची योजना करू शकत नसेल. तर ती एग फ्रिजिंगचा पर्याय निवडू शकते.ज्यामध्ये स्त्री ची अंडी गोठवून तिला हवे त्या वेळी गर्भाशयात सोडले जातात आणि वाढत्या वयातही आई होण्याचे सुख मिळू शकते. अँटी-मुलेरियन हार्मोन हे अंडाशयात ग्रॅनुलोसा पेशींची निर्मिती करतात. प्रत्येक गर्भाशयात बीजांडांची संख्या निश्चित असते आणि ही संख्या आनुवंशिक घटकच असते. यालाच गर्भाशयातील राखीव जागा असे म्हणतात. स्त्रियांचे वय वाढत जाते, त्यानुसार अंड्यांची संख्या कमी होते 

8/14

थायरॉईड चाचण्या

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

थायरॉईड विकार प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. तुमच्या तपासणीमध्ये थायरॉईड फंक्शन चाचण्यांचा समावेश केल्याने थायरॉईडचे आरोग्य गर्भधारणेसाठी अनुकूल असल्याची खात्री होते.

9/14

पुरुषांकरिता चाचणी

सीमन अ‍ॅनालिसिस - या चाचणीत पुरुषांच्या शुक्राणूचे आरोग्य आणि विकास क्षमतेबाबत माहिती मिळते. यात शुक्राणूंची संख्या, त्यांचा आकार आणि त्यांची हालचाल यांचे निरीक्षण केले जाते.

10/14

संप्रेरक पातळी:

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

पुरुषांमधील हार्मोनल असंतुलन, टेस्टोस्टेरॉन पातळी हे प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते. संप्रेरक चाचण्या या संभाव्य समस्या ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करतात.

11/14

जनुकीय चाचणी

शुक्राणूंची संख्या कमी असेल तर त्याचा अर्थ होतो की, तुम्हाला अनुवांशिकतेमुळे वंध्यत्वाची समस्या जाणवत आहे. यासाठी तुमच्या शुक्राणूचा नमुना घेऊन तपासणी केली जाते.

12/14

प्रजनन चाचण्यांचे फायदे:

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

वेळीच समस्या ओळखणे: प्रजनन चाचण्या कोणत्याही अंतर्निहित पुनरुत्पादक आरोग्य समस्या ओळखण्यास परवानगी देतात, वेळीच हस्तक्षेप आणि व्यवस्थापन सक्षम करतात.

13/14

कौटुंबिक नियोजनास मदत:

Men and women should know their fertility ahead of time Sexual Health Tips

यामुळे जोडप्यांना कुटुंब नियोजन, गर्भधारणेची वेळ आणि आवश्यक असल्यास संभाव्य प्रजनन उपचारांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेता येतात.

14/14

तणाव कमी करते:

तुमची प्रजनन क्षमता जाणून घेतल्याने गर्भधारणेशी संबंधित तणाव आणि अनिश्चितता कमी होऊ शकते. तुमच्या प्रजनन आरोग्याची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात प्रवेश करत असताना, तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये प्रजनन क्षमता चाचण्या जोडण्याचा विचार करा. हे सक्रिय पाऊल केवळ आरोग्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोनासाठी योगदान देत नाही तर तुमच्या प्रजनन भविष्याबद्दल आवश्यक ज्ञान आणि अंतर्दृष्टी देखील देते. तुमची प्रजनन क्षमता हा तुमच्या एकूण आरोग्याचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला प्राधान्य देऊन तुम्ही निरोगी आणि आनंदी कुटुंब निर्माण करत नवीन वर्षात प्रवेश करा. मुंबईतील नोव्हा आयव्हीएफच्या प्रजनन सल्लागार डॉ. युगाली वराडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.