2 वेळा लग्न, 4 वर्षांमध्ये घटस्फोट, 4 महिन्यात नेमकं असं काय घडलं? हार्दिक - नताशाच्या वेगळी होण्याही 'ही' ठरली कारणं

Hardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने घटस्फोटाचा निर्णय अखेर जाहीर केला. या दोघांनी 3 वेळा लग्न केलं होतं, या चार वर्षांच्या संसारात त्यांनी सामंजस्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. जयपूरमध्ये ग्रँड लग्न केल्यानंतर गेल्या 4 महिन्यात असं काय घडलं. या दोघांनी वेगळ्या होण्यासाठी कुठली कारणं ठरलं. 

नेहा चौधरी | Jul 20, 2024, 21:39 PM IST
1/7

गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा हे वेगळे होणार आहेत, अशी चर्चा होत होती. पण या दोघींपैकी कोणीही अधिकृत्यपणे काही भाष्य केलं नव्हतं. अखेर हार्दिक आणि नताशा यांनी एक पोस्ट शेअर ते विभक्त होणार हे जाहीर केलं. 

2/7

या दोघांची पार्टीत भेट 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्या लग्नाच्या वेळी नताशा प्रेग्नेट होती. त्यामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं. त्याशिवाय लग्नाच्या वेळी कोरोनामुळे लॉकडाऊन होतं. 

3/7

त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला जयपूरमध्ये पुन्हा थाट्यामाट्यात लग्न केलं. ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने त्यांनी विवाह केला. या लग्नानंतर काही महिन्यांमध्येच त्या दोघांमध्ये काही तरी बिनसलय अशी अफवा पसरली. या दोघांच्या घटस्फोटामागे कुठली कारणं असू शकतात यावर तर्कवितर्क लावली जात आहे. 

4/7

नताशा ही एक सर्बियन मॉडेल आहे. त्यामुळे 2020 लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांना मुलं झालं होतं. कदाचित हे कारण ठरलं असेल की, तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाहीत. 

5/7

तर हार्दिक पांड्या हा जेव्हा मैदानात खेळत नाही तेव्हा तो पार्टी करताना किंवा बेफिकीरपणे प्रवास करताना दिसतो. लग्नानंतरही त्याच्या या गोष्टी सुरुच असल्याच दिसून येत होत. कदाचित हार्दिकच्या या स्वभावामुळे नताशाला असुरक्षित वाटत असावं. हे कारण त्यांच्या घटस्फोटाच कारण असू शकतं असं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

6/7

T20 वर्ल्डकपपूर्वी हार्दिकच्या कारकिर्दीतीबद्दल बोलायचं झालं तर ते वाईट स्थितीतून जात होतं. एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळी त्याला दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर राहावं लागलं. त्यानंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनून तो परतला आणि तो खूप ट्रोल झाला. तिथेही त्याची जादू मैदानात दिसली नाहीत. हार्दिकचं घसरत स्टारडममुळे कदाचित नताशा नाराज असेल. हेही कारण घटस्फोटाचा असू शकतं. 

7/7

हार्दिक आणि नताशा यांच्यात किती प्रेम होते याचा अंदाज या दोघांनी दोनदा लग्न केल्यामुळेच लावता येतो. दुसऱ्या लग्नाला वर्षभरानंतरच दोघांमध्ये काहीतरी घडलं असावं जे कदाचित त्यांच्या मताशी जुळलं नसेल. गेल्या काही काळात सोशल मीडियावर दोघेचे काही खास पोस्टही दिसत नव्हते. सार्वजनिक कार्यक्रमातही दोघे एकत्र दिसले नाहीत. अगदी T20 वर्ल्डकप जिंकून हार्दिक भारतात आल्यानंतरही नताशा कुठेही नव्हती. या सर्व गोष्टींवरून असं दिसून आलं की या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद होते, जे आता घटस्फोटापर्यत गेले.