पतीच्या निधनानंतरही खंबीरपणे उभ्या राहिल्या 'या' मराठी अभिनेत्री

Dec 07, 2023, 19:30 PM IST

ऐन तारुण्यात जेव्हा पतीचं निधन होत. तेव्हा खचून न जाता समाजासमोर तसंच आपल्या मुलांसमोर  एक आदर्श व्यक्तिमत्व उभं करणाऱ्या या मराठी अभिनेत्री आहेत. 

1/10

आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री या त्यांच्या अभिनयासाठी तसंच  त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीमुळे नेहमी  चर्चेत असतात. 

2/10

आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्री. 

3/10

खऱ्या आयुष्यात  सुखी संसार सुरु असताना ,अर्ध्यातचं जोडीदाराने सोडलेली साथ यामुळे एकटीने स्वतःच विश्व सुंदर करणारया  तसच  मुलांच संगोपन करणाऱ्या या अभिनेत्री 

4/10

ऐन तारुण्यात पत्नीच्या निधनानंतर या अभिनेत्रींनी खचून न जाता एका आदर्श व्यक्तिमत्वाची तसेच आईची भूमिका निभावत आहेत. 

5/10

अभिनेत्री प्रिया बेर्डे

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे ही जोडी. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे यांचा सांभाळ केला. 

6/10

अभिनेत्री शुभांगी गोखले

अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनानंतर खचून न जाता  शुभांगी  गोखलेंनी सखीचा सांभाळ केला. छोट्या पडद्यावरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेत्री सखी गोखलेही  घराघरात पोहचली. 

7/10

अभिनेत्री ज्योती चांदेकर

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचि आई जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आहेत. पतीच्या मृत्यनंतर ज्योती चांदेकर यांनी आपल्या मुलींना मोठं केलं. 

8/10

अभिनेत्री नीना कुलकर्णी

आपल्या अभिनयाच्या शैलीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ पडण्याच्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचे पती अभिनेते दिलीप कुलकर्णी. आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या मुलांचा सांभाळ केला.   

9/10

अभिनेत्री निर्मिती सावंत

आपल्या अभिनयाने तसेच विनोदी शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या निर्मिती सावंत यांचं महेश सावंत यांच्याशी विवाह झाला होता. आपल्या पतीच्या जाण्याने निर्मिती सावंत खचून न जात मुलगा अभिनय सावंतला मोठं केलं.   

10/10

अभिनेत्री मयुरी देशमुख

आपल्या अभिनयाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री . मराठी तसेच हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख. पतीने आत्महत्या करून आपला जीवन प्रवास संपवला होता. या मोठ्या धक्क्यातून सावरून पुन्हा नव्याने सुरुवात केला.