'आई-बाबांनी सुचवलेले स्थळ, घरातच मारलेल्या गप्पा अन्...', 9 वर्षांनी मृणाल दुसानिसने सांगितली लग्नाची हटके स्टोरी

नम्रता पाटील | Apr 20, 2024, 22:06 PM IST
1/9

मालिकामधून प्रसिद्धीझोतात

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’ या मालिकामधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखले जाते.

2/9

2016 मध्ये अडकली लग्नबंधनात

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

मृणाल कुलकर्णी ही 2016 मध्ये लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर काही वर्षे मालिकेत काम केल्यानंतर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली.

3/9

मृणालने सांगितली तिच्या लग्नाची स्टोरी

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

आता मृणाल दुसानिस ही 4 वर्षांनी पुन्हा एकदा मायदेशी परतली. 'सेलिब्रिटी कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिचे लग्न कसं जमलं याबद्दल सांगितले आहे.

4/9

आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एकदा मला त्याचा फोन आला, फोटो पाठवले, असे मृणाल म्हणाली.

5/9

त्यानंतर मी लग्नाचा निर्णय घेतला

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं. आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती, त्यामुळे मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे मृणाल म्हणाली.

6/9

घरातच 3-4 मिनिटं गप्पा मारल्या

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

आमचं बोलणं झाल्यावर तो अमेरिकेतून इथे आला. आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही. घरातच 3-4 मिनिटं आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही दोघेही 6 महिने फोनवर एकमेकांशी बोलत होतो, असेही मृणालने म्हटले.  

7/9

मला तो आवडला होता

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

मी तेव्हा ठरवलं होतं की, हा मुलगा चांगला आहे. एकंदर मला तो आवडला होता. त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले होते. त्यावेळी नीरज मला भेटायला आला होता.

8/9

सगळ्या गोष्टी जुळून आल्या

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

तेव्हा आमचं लग्न आधीच ठरलेलं होतं. असं साध्या सोप्या पद्धतीने अगदी लगेच सगळ्या गोष्टी जुळून आल्या. असं मृणाल दुसानिस म्हणाली.  

9/9

सध्या लेकीसह भारतात वास्तव्यास

Marathi Actress Mrunal Dusanis Marriage share love story after 9 years of marriage

मृणाल दुसानिस ही अमेरिकेत वास्तव्यास होती. त्या दोघांना आता नुर्वी नावाची गोड मुलगी आहे. काही दिवसांआधीच अभिनेत्री पती आणि लेकीसह भारतात परतली.