11 वर्षांपासून दीपिका-रणवीरकडून करीनाला आहे 'या' गोष्टीची प्रतिक्षा!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 6 वर्ष पूर्ण होतील. सध्या हे दोघेही त्यांच्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे दीपिका सिंघमच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, या सगळ्यात एका अभिनेत्रीनं म्हटलं आहे की ती गेल्या 11 वर्षांपासून त्या दोघांकडून एका गोष्टीची प्रतिक्षा करत आहे. 

Diksha Patil | Apr 20, 2024, 18:57 PM IST
1/7

रणवीर-दीपिका

रणवीर आणि दीपिकाविषयी बोलायचे झाले तर ते दोघं 'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटामुळे जवळ आले होते. 

2/7

'गोलियों की रासलीला रामलीला'

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवर आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

3/7

दीपिका आधी कोणाला होती चित्रपटाची ऑफर

संजय लीला भन्साळी यांच्या डोक्यात या चित्रपटात दीपिका नाही तर दुसरी अभिनेत्री होती. दीपिका आधी या चित्रपटाती ऑफर ही करीना कपूरला देण्यात आली होती. 

4/7

करीनाचा नकार

करीनानं या चित्रपटाला नकार दिला आणि त्यामुळेच दीपिकाला या चित्रपटात कास्ट करण्यात आलं. 

5/7

करीना दोघांकडून या गोष्टीची करते प्रतिक्षा

बीबीसी एशिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत करीनानं याविषयी खुलासा केला आहे. करीना मस्करीत म्हणाली रणवीर आणि दीपिकानं तिचे 'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटाला नकार देण्यासाठी आभार मानले नाही. 

6/7

रणवीर आणि दीपिकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील हा चित्रपट टर्निंग पॉइंट होता. त्या चित्रपटामुळे जवळ आले आणि मग 2018 मध्ये त्यांनी सप्तपदी घेतल्या. 

7/7

दीपिका

दीपिका सगळ्यात शेवटी फायटर या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.