मराठ्यांचं वादळ येतंय! अंतरवाली ते मुंबई 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग

 26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल. 

| Jan 23, 2024, 18:54 PM IST

Maratha Reservation: 26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल. 

1/8

मराठ्यांचं वादळ येतंय! 'अंतरवाली ते मुंबई' 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी समाज बांधव आणि कार्यकर्त्यांना 'चलो मुंबई' ची हाक दिली आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून ही पदयात्रा सुरु झाली. मजलदरमजल करत 26 जानेवारी रोजी ही पदयात्रा मुंबईत पोहोचणार आहे. यादरम्यान मनोज जरांगेंचा मार्ग कसा असेल? याबद्दल जाणून घेऊया. 

2/8

गेवराईमार्गे शिरुर

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून पदयात्रा सुरु झाली. दुपारी गेवराई तालुक्यातील कोळगावात थांबली तर रात्रीचा मुक्काम शिरुरच्या मातोरी येथे झाला. 

3/8

21 जानेवारीला दुपारी पदयात्रा पाथर्डीच्या तनपुरवाडी येथे थांबली त्यानंतर बाराबाभली (करंजीघाट) येथे रात्रीच्या मुक्कामासाठी थांबली.

4/8

सुपामार्गे शिरुर

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

22 जानेवारी रोजी दुपारी सुपा येथे तर रात्री शिरुर तालुक्यातील मातोरी येथे थांबली.

5/8

कोरेगाव भीमामार्गे पुण्यात

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

23 जानेवारी रोजी दुपारी कोरेगाव भीमामार्गे रात्री पुण्यातील खराडी बायपास चंदननगर येथे पोहोचून विश्रांती घेणार आहेत. 

6/8

पुण्यातून लोणावळा

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

24 जानेवारी रोजी पुणे शहर- जगताप डेअरी- डांगे चौक- चिंचवड-देहूफाटा या मार्गाने ही पदयात्रा जाईल. तर रात्री लोणावळा येथे मुक्कामी असेल. 

7/8

पनवेलमार्गे रात्री वाशीत

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

25 जानेवारी रोजी दुपारी पनवेलमार्गे रात्री वाशी येथे पोहोचेल.

8/8

चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत

Maratha Reservation Manoj Jarange Padyatra Antarwali sarati to Mumbai

26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल.  फोटो सौजन्य- शिवराज माने