ताजमहाल भोवती का आहेत तुळशीची 80 हजार रोपं? कारण जाणून बसेल धक्का

ताजमहाल भोवती हजारो तुळशीची रोपं का लावण्यात आली आहेत याचे कारण जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

वनिता कांबळे | Feb 19, 2025, 23:36 PM IST

Taj Mahal Unknown Facts  :  ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. प्रेमाचं प्रतिक असलेला ताजमहल भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. लाखो पर्यटक तामहलला भेट देतात आणि याचे सौंदर्य पाहून थक्क होतात.  ताजमहाल भोवती  तुळशीची 80 हजार पेक्षा जास्त रोपं लावलेली आहेत. जाणून घेय़ा यामागचे कारण.

 

1/7

मुघल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहलच्या भोवती चारही बाजूला 80 हजार पेक्षा जास्त तुळशीची रोपं आहेत. 

2/7

तुळस ही एक औषधी वनस्पती आहे, जी हवा शुद्ध करते. त्यात कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड सारखे विषारी वायू शोषून घेण्याची क्षमता आहे. या वनस्पतीतून निघणारा ओझोन वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून ताजमहालचे रक्षण करतो.  

3/7

तुळशीच्या झाडामध्ये युजेनॉल नावाचे सेंद्रिय संयुग असते. ज्यामध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची क्षमता असते. म्हणून, ताजमहालभोवती सुमारे  80,00 तुळशीची झाडे लावण्यात आली आहेत.

4/7

ताज नेचर वॉक या स्मारकापासून सुमारे 500 मीटर अंतरावर सर्वत्र 80 हजार पेक्षा तुळशीची झाडे लावण्यात आली आहेत. 

5/7

ताजमहलच्या चारही दिशेला चार मिनार आहे तसेच ताजमहल समोर मोठी बाग देखील आहे. 

6/7

आग्रा येथील यमुना नदीच्या काठावर  42 एकर जमिनीवर ताजमहल बांधण्यात आला आहे.   

7/7

 1983 मध्ये युनेस्कोने ताजमहालला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.