महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला; मराठ्यांनी यानंतर बांधला नाही एकही किल्ला

मल्हारगड हा महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला आहे. जाणून घेवूया या किल्ल्याविषयी. 

| Apr 19, 2024, 21:43 PM IST

Malhargard Fort : महाराष्ट्रातील गड किल्ले मराठा सम्राज्याच्या गौरवशाली इतिहासचे साक्षीदार आहेत. पुणे जिल्ह्याजवळ असलेला मल्हारगड हा मराठा साम्राज्यात बांधला गेललेला शेवटचा किल्ला आहे.  1757 ते 1760 या काळात हा किल्ला बांधला गेला. 

1/7

मल्हारगड हा महाराष्ट्रातील मराठा साम्राज्यात बांधलेला शेवटचा किल्ला आहे.   

2/7

 पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर डावीकडे  झेंडेवाडी गावाचा फाटा आहे. पुढे गेल्यावर डोंगराची एक रांग दिसते. या डोंगर रांगेत एका खिंडीत हा किल्ला आहे.   

3/7

हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. मराठा चे सरदार भीमराव पानसे यांनी  या किल्ल्याची बांधणी केली. 

4/7

समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे.  मल्हारगड आकाराने अतिशय लहान किल्ला आहे. साडेचार ते पाच एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. 

5/7

मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. 

6/7

हा डोंगरी किल्ला पश्चिम घाटावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.    

7/7

पुणे जिल्ह्यातील सासवडपासून 30 किलोमीटर अंतरावर मल्हारगड हा किल्ला आहे.