Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदारांनी भरघोस मतदान केलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. 

| Apr 19, 2024, 19:30 PM IST
1/7

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. 21 राज्यातील 102 जागांवर एकूण 1600 उमेदवार उभे होते. त्यांचं भवितव्य मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केलं.  सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. देशात सरासरी 59.71% नोंद झाली आहे.

2/7

मतदानात पश्चिम बंगालने बाजी मारली. पश्चिम बंगालमधअये तब्बल 77.57% टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये 46.32 मतदान झालं. 

3/7

महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 57.06 टक्के मतदान झालं.  पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं.

4/7

अंदमान आणि निकोबार: 56.87%, अरुणाचल प्रदेश: 63.26%, आसाम: 70.77%, बिहार: 46.32%, छत्तीसगड: 63.41%, जम्मू आणि काश्मीर: 65.08%, लक्षद्वीप: 59.02%, मध्य प्रदेश: 63.25%, मणिपूर: 67.46%, मेघालय: 69.91%, मिझोरम: 52.62%, नागालँड: 55.75%, तर पुद्दुचेरी: 72.84% टक्के मतदान झालं.

5/7

याशिवा. राजस्थान:50.27%, सिक्कीम: 67.58%, तामिळनाडू: 62.02% ,त्रिपुरा: 76.10% ,उत्तर प्रदेश: 57.54% ,उत्तराखंड: 53.56% , पश्चिम बंगाल: 77.57% टक्के मतदान पार पडलं. 

6/7

102 जागांवर 16.63 कोटी मतदार होते. यात  8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 ट्रान्सजेंडर मतदार होते. 35.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार होते. 13.89 लाख दिव्यांग मतदारांचा समावेश होता. त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.

7/7

काही मतदारसंघात हिसेंच्या घटना घडल्या. बीजापूरमध्ये निवडणुकीसाठी तैनात असलेला सीआरपीएफ जवान देवेंद्र कुमार शहीद झाले. काही जणांनी इथ बॉम्ब स्फोट घडवले. यात देवेंद्र कुमार यांचं निधन झालं. मणिपूरमध्ये काही मतदार संघात फायरिंगच्या घटना घडल्या. पण यानंतरही लोकांनी मतदान केलं.