Mahindra Thar 2WD: महिंद्राची 10 लाखांखालील जबरदस्त थार, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Mahindra Thar 2WD:महिंद्रा अँड महिंद्राने थार 2WD 9 जानेवारीला भारतात लाँच केली आहे. ऑल-न्यू थार हे आयकॉनिक डिझाइन आणि सर्व-नवीन इंटिरियर्ससह सुसज्ज आहे.ग्लोबल NCAP द्वारे या गाडीला प्रौढ आणि बालकांच्या सुरक्षेमध्ये 4 स्टार रेट मिळाले आहेत. 

Jan 09, 2023, 20:10 PM IST
1/6

Mahindra Thar 2WD

महिंद्रा थार 2WD या गाडीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. (Pic: auto.mahindra.com) 

2/6

Mahindra Thar 2WD

ही गाडी AX (O) RWD डिझेल MT, LX RWD डिझेल MT आणि LX RWD पेट्रोल AT या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. (Pic: auto.mahindra.com) 

3/6

Mahindra Thar 2WD

नवीन लाँच केलेले वाहन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे - ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाइट. हे रंग पूर्वी उपलब्ध पर्यायांव्यतिरिक्त आहेत ज्यात रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि एक्वा मरीन यांचा समावेश आहे. (Pic: auto.mahindra.com) 

4/6

Mahindra Thar 2WD

अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 17.8 सेमी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, HVAC, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये MID डिस्प्ले, वन-टच लेन चेंज इंडिकेटर, रिअर पार्किंग सेन्सर्स, रिमोट कीलेस एंट्री, 12V ऍक्सेसरी सॉकेट आणि बरेच काही यासारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. (Pic: auto.mahindra.com) 

5/6

Mahindra Thar 2WD

मॉडेलमध्ये 1.5-लिटर D117 CRDe डिझेल इंजिन असून 117 hp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर 300 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यात देखील कार्यक्षम आहे. इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.0-लिटर mStallion 150 TGDi युनिटसह येतील. (Pic: auto.mahindra.com) 

6/6

Mahindra Thar 2WD

प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ग्लोबल NCAP द्वारे ऑल-न्यू थारला 4 स्टार रेट मिळाले आहेत. यात ESP आणि ABS फीचर्स देखील आहेत. त्याशिवाय यात ड्युअल फ्रंट बॅग, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, पॅनिक ब्रेकिंग सिग्नल, मागील सीटवर ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. (Pic: auto.mahindra.com)