'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 15:06 PM IST

Maharashtra Tourism : महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि त्या इतिहासाच्या पाऊलखुणा अनेकदा आपल्यासमोर असे काही पुरावे आणून ठेवतो की हैराण होण्यावाचून दुसरी कोणतीही प्रतिक्रिया उरत नाही. 

1/9

खांदेरी

Maharashtra tourism sea based forts history names and photos

मुंबई शहराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या समुद्रात हा किल्ला बांधण्यात आला. 1679 मध्ये मायनाक भंडारी, दौलतखानाच्या सैनिकांनी मुंबईवर वचक ठेवम्य़ासाठी म्हणून हा किल्ला उभारला होता. थळ बंदर किंवा किहीमवरून या किल्ल्यावर पोहोचता येतं. 

2/9

उंदेरी

Maharashtra tourism sea based forts history names and photos

जंजिऱ्याच्या सिद्दीनं खांदेरी आणि थळच्या मध्ये असणाऱ्या एका बेटावर उभारला उंदेरी, किंवा जलदुर्ग.   

3/9

घारापुरीचा किल्ला

Maharashtra tourism sea based forts history names and photos

घारापुरी लेण्यांच्या पश्चिमनेला एक ब्रिटीशकालीन किल्ला आहे, हे तुम्हाला माहितीये? इथं असणाऱ्या तोफा पाहून थक्क व्हायला होतं.   

4/9

खूबलढा

Maharashtra tourism sea based forts history names and photos

सध्या किल्ला सुस्पष्ट दिसस नसला तरीही किल्ल्याचे काही अवशेष मात्र आजही अस्तित्वात असल्याचं लक्षात येतं.   

5/9

अलिबागचा कुलाबा किल्ला

Maharashtra tourism sea based forts history names and photos

मराठी आरमाराचे सरखेल अशी ओळख असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांची राजधानी म्हणजे कुलाबा किल्ला. इथं समुद्राला ओहटी असेल तेव्हा अलिबागच्या किनाऱ्यावरून सहज पोहोचता येतं. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरु करून छत्रपती संभाजी महाराजांनी ते पूर्णत्वास नेलं. इथंच कान्होजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांचा धुव्वा उडवला होता.   

6/9

रेवदंड्याचा किल्ला

Maharashtra tourism sea based forts history names and photos

रेवदंड्यात फिरत असताना पोर्तुगीज किल्ल्याचं प्रवेशद्वार गावातील मुख्य रस्त्यावरच आढळतं. समुद्राला ओहोटी असताना या किल्ल्याच्या अवशेषांना जवळून पाहता येतं.   

7/9

राजकोट

Maharashtra tourism sea based forts history names and photos

रेवदंड्यानजीकच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या राजकोट किल्ल्याचे अवशेष सापडतात. हमाम, किल्ल्याच्या भींतींचे अवशेष इथं आढळतात.   

8/9

कोर्लई

Maharashtra tourism sea based forts history names and photos

अलिबागपासून नजीकच रेवदंडा किनारा संपल्यावर एका टेकडीवर कोर्लईचा किल्ला आहे. गुजरातच्या सुलतानाला पराभूत करून पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता. इथेल नागरिक नो लिंग भाषा बोलतात.   

9/9

जंजिरा

Maharashtra tourism sea based forts history names and photos

छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा प्रयत्न करूनही जो किल्ला काबिज करता आला नाही, तो हा जंजिरा. या किल्ल्यावर अनेक अभेद्य बुरूज, तोफा इत्यादी अवशेष पाहायला मिळतात.