तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 12 नव्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers: राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसला आहे. या नव्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Oct 04, 2023, 16:08 PM IST
1/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्याची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे पाहूयात...

2/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सुरु असलेला पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. 

3/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.

4/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

अकोल्याचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांकडे नगरचेही पालकमंत्रीपद आहे.  

5/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आलेल्या चंद्रकांत पाटील यांना सोलापूर, अमरावतीचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. हा निर्णय एक प्रकारे अजित पवार यांचं मोठं राजकीय यश मानलं जात आहे.

6/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

वर्ध्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

7/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

तर विजयकुमार गावित हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असतील.  

8/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

बुलढाण्याचं पालकमंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

9/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

कोल्हापूरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत.  

10/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

11/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे सोपवण्यात आलं आहे. विद्यमान मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यात ज्या बीड जिल्ह्यावरुन शीतयुद्ध सुरु असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

12/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

13/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

नंदूरबारचं पालकमंत्रीपद अनिल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

14/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुनही वाद सुरु असल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपात या जिल्ह्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

15/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना विरोध असल्याने सध्या तरी या मतदारसंघासंदर्भात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भरत गोगावलेंनीही या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर अनेकदा सूचकपणे दावा सांगितला आहे.

16/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं नाही. हे पद सध्या दादा भुसे यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. 

17/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री न बदलून शिंदेंनी स्वत:चं राजकीय वजन वापरल्याचं दिसून येत आहे.

18/18

Maharashtra Full Revised List Of Guardian Ministers

अशी आहे नव्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी