ठाकरे, शिंदे, मुंडे आणि... राज्यात शनिवारी पाच दसरा मेळावे, पाहा कोणत्या नेत्याची तोफ कुठे धडाडणार
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याचा दसरा मेळावा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दसऱ्या मेळाव्यातून सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करणार असून निवडणूकीचं रणशिंगही फुंकलं जाणार आहे. राज्यात उद्या तब्बल पाच दसरा मेळावे होणार आहेत. पाहुयात कोणत्या नेत्यांचा कुठे दसरा मेळावा होणार
1/7
ठाकरे, शिंदे, मुंडे आणि... राज्यात शनिवारी पाच दसरा मेळावे, पाहा कोणत्या नेत्याची तोफ कुठे धडाडणार
2/7
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथं होणार आहे. या मेळाव्याचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची… वाजत गाजत गुलाल उधळत या… असं आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
3/7
शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. याआधीचे दोन दसरा मेळावे हे बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर झाले होते. पण यंदाच्या दसरा मेळाव्याचं स्थान बदलण्यात आलं आहे. शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणण्यात आलेल्या आहेत.
4/7
5/7
6/7