लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त 'या' कारणासाठी येतात इथे

लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे. 

वनिता कांबळे | Jun 30, 2024, 23:42 PM IST

Lonavala Tourist Point : महाराष्ट्रात अनेक पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. देश विदेशातील पर्यटकांना हे टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतात. यापैकीच एक आहे ते  लोणावळा.  हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. पण लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट कोणता आहे हे माहित आहे का?

1/7

 लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. भुशी डॅम, भाजे लेणी, एकवीरा देवी गड अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. मात्र,  लोणावळ्यात आल्यावर एक असे ठिकाण आहे जे पाहिल्याशिवाय कुणीही परत जात नाही.   

2/7

लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, लेणी अशी ठिकाणे येथे पाहता येतात. 

3/7

लोणवळ्यात टायगर पाईंट हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण असत. पावसाळ्यात तर इतकं दाट धुकं असत की समोरचा माणूसही दिसत नाही.     

4/7

 लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.

5/7

लोणावळ्याला खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा काही वेगळीच. पावळ्यात तर येथे फिरताना स्वर्ग सुखाचा अनुभव येतो.   

6/7

पुणे आणि मुंबई पासून लोणावळा हे हिल स्टेशन अगदी जवळ आहेत. बाय रोड तसेच रेल्वेनेही येथे अगदी सहज पोहचता येते.   

7/7

 लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर आणि गजबजलेले हिल स्टेशन आहे. सर्व ऋतुंमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते.