टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Saurabh Talekar | Jun 30, 2024, 23:33 PM IST
1/5

निरोप देण्याची वेळ

फॉरमॅटला निरोप देण्याची उत्तम वेळ आहे. मला यातील प्रत्येक क्षण आवडला. हा माझा शेवटचा खेळ होता, असं रोहित म्हणतो.

2/5

टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्माने वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

3/5

एकदिवसीय आणि टेस्ट खेळणार

त्यावेळी आपण एकदिवसीय आणि टेस्ट फॉरमॅट खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर आयपीएल खेळणार का? यावर देखील त्याने उत्तर दिलंय.

4/5

आयपीएल खेळणार का?

टी-ट्वेंटीमधून निवृत्ती घेतलीये पण आयपीएल खेळणार का? असा सवाल रोहित शर्माला पत्रकारांनी विचारला.

5/5

हिटमॅन म्हणतो...

नक्कीच मी 100 टक्के आयपीएल खेळणार, असं स्पष्ट उत्तर हिटमॅनने दिलं. मात्र, रोहित मुंबईकडूनच खेळणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.