‘माझी पत्नी कलयुगातील आहे आणि...'; बायकोच्या अफेअरच्या प्रश्नावर खेसारी लाल यादवचं धक्कादायक वक्तव्य

भोजपुरी कलाकारांची देखील खूप चांगली फॅन फॉलोइंग होती. खेसारी लाल यादव भोजपुरी इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा स्टार आहे. त्यांचे चित्रपट आणि गाण्यांची देखील तितकीच क्रेझ असते. खेसारी नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन खूप चर्चेत असतो. इतकंच नाही तर अभिनेता त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. खेसारी लाल यादव विवाहीत आहे. पण त्याचं नाव भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीशी देखील जोडण्यात आलं होतं. 

Diksha Patil | Jul 06, 2024, 15:01 PM IST
1/7

एक वेळ होती जेव्हा खेसारी आणि काजलच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. खरंतर आता ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. खरंतर खेसारी लाल यादव एक पॉडकास्ट शोमध्ये पोहोचला होता. 

2/7

त्यावेळी त्याला त्याच्या पत्नीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारण्यात आलं की त्याची पत्नीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर असतं तर? 

3/7

खेसारी लालनं असं आश्चर्य कारक उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, 'माझी पत्नी कलयुगातील पत्नी आहे. द्वापर युगातली नाही. ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझी पत्नीही असती तर तिचं देखील कोणासोबत अफेअर असतं.' 

4/7

पुढे खेसारी लाल म्हणाला, 'जितक्या विवाहीत महिला आहेत, ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. त्यांचे अफेयर नसतात? त्यांचे संबंध नसतात का? असं होतं की जेव्हा कोणासोबत आपण 4-5 महिने राहतो, तर प्राण्यांवर देखील प्रेम होतं.'   

5/7

खेसारी लालनं त्याच्या या वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. खरंतर कलाकार नेहमीच अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणं टाळतात. पण खेसारी लालनं असं केलं नाही. 

6/7

त्यांनी इंडस्ट्रीमधील सत्य सगळ्यांसमोर उघड केलं. खेसारी आणि काजलनं एकत्र अनेक चित्रपट केले. कामासोबत एकमेकांसोबत त्यांचं नाव देखील जोडण्यात आलं. 

7/7

इतकंच नाही तर खेसारी आणि काजलच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्याशिवाय त्यांच्यात एक चांगलं बॉन्ड आहे.