श्रीमंत, समवयीन, गोऱ्या पुरुषांना न कळताच... स्वत:च्या आईबद्दल सुव्रत जोशीची भन्नाट पोस्ट; तुम्हीही कराल रिलेट
Suvrat Joshi Mother Photos : 90`s Kid असाल तर त्यानं लिहिलेला प्रत्येक शब्द वाचताना डोळ्यापुढं स्वत:चेच आईवडील येतील... पाहा हे सुरेख फोटो...
Suvrat Joshi Mother Photos : विविध मालिका, नाटकं, सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी सध्या एका कमाल कारणानं चर्चेत आहे. इथं निमित्त ठरतेय ती त्याची आई...
1/7
सखी गोखलेचा पती

2/7
नवा अनुभव

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सुव्रतनं यावेळी पत्नी नव्हे तर, त्याचा आईचा एक अनुभव, आईच्या इंग्लंड वारीचे काही फोटो शेअर केले. या फोटोसोबत त्यानं मनातील उत्साह, कुतूहल आणि अनेक अव्यक्त भावनांना वाटही मोकळी करून दिली. आपल्या आईनं पहिल्यांदाच बूट वापरण्यापासून तिला सनग्लासेस देऊ करेपर्यंतचा अनुभव सुव्रतनं या फोटोंमध्ये मांडला.
3/7
खिशाला खार लावून,धाडस...

आईनं केलेल्या या अविस्मरणीय भेटीविषयी त्यानं लिहिलं, 'मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढवतानाही आई- बाबांनी,नेहेमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस आणि सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली. खिशाला खार लावून,धाडस करून उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपट आणि नाटक माझ्या बालपणाच्या ओंजळीत भरभरून ओतली. यात स्वतःच्या इच्छांना मुरड घातली. मी माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमावले त्याच्यात या बालपणी मिळालेल्या विविधरंगी अनुभवाच्या कंपास पेटीचा सिंहाचा वाटा आहे.'
4/7
वडिलांच्या अनुपस्थितीतही ...

5/7
आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले

'आता बाबा नाही पण म्हणून आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी तीव्र इच्छा होती. अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले. आईच्या लंडनवारीची तयारी करायला घेतली. भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले. तिच्या पायाचे AI mapping करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले खरे, पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला. तिने आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते. आजवर याआधी तिने कधी बुटच घातले नाहीत. इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती', असं तो म्हणाला.
6/7
गमतीशीर अनुभव

7/7
फार चिकणी दिसते ती..
