Kane Williamson:'या' सामन्यात केन विलियम्सन करणार कमबॅक; कोचने दिली महत्त्वाची माहिती

Kane Williamson : न्यूझीलंडच्या टीमची वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ सध्या आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

Surabhi Jagdish | Oct 31, 2023, 13:02 PM IST
1/7

न्यूझीलंडच्या टीमला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या टीमविरुद्ध 1 नोव्हेंबरला पुण्याच्या मैदानावर खेळायचा आहे. 

2/7

या सामन्यात किवी टीमचा कर्णधार केन विलियम्सनचं कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे. 

3/7

बांगलादेशविरुद्धनंतर दुखापतीमुळे शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. 

4/7

न्यूझीलंड टीमचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांच्या म्हणण्यानुसार, सामन्याच्या 24 तास आधी तो टीमसोबत सराव सुरू करेल. जेणेकरून तो या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध आहे की नाही याची कल्पना येऊ शकेल.

5/7

सरावानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत आम्हाला पूर्णपणे स्पष्ट चित्र दिसेल, असंही ते म्हणालेत.

6/7

या सामन्यात तो प्रदीर्घ कालावधीनंतर फीट होऊन मैदानात परतला होता, मात्र दुखापतीमुळे त्याला पुन्हा प्लेइंग-11 मधून बाहेर व्हावं लागलं.

7/7

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना केन विल्यमसनचा अंगठा फ्रॅक्चर झाला.