New Zealand New Captain: केन विलियम्सनने सोडलं कर्णधारपद; आता कोण होणार नवा कर्णधार?

Kane Williamson: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडची टीम सुपर 8 मध्येही स्थान निश्चित करू शकली नाही.  यानंतर आता टीमचा कर्णधार केन विलियम्सनने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Surabhi Jagdish | Jun 19, 2024, 15:00 PM IST
1/7

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

2/7

यावेळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

3/7

केवळ सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच नाही तर व्हाईट बॉल क्रिकेट म्हणजेच मर्यादित ओव्हर्सच्या फॉर्मेटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

4/7

केन विलियम्सनने दीर्घकाळ वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंड टीमचं नेतृत्व केले आहे. 

5/7

पण आता लवकरच संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. यानंतर चाहत्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, आता किवी टीमचा नवा कर्णधार असणार आहे? 

6/7

यामध्ये ड्वेन कॉन्वे, डॅरेल मिचेल आणि मिचेल सँटनर यांची नावं चर्चेत आहे. 

7/7

केन विल्यमसनने यापूर्वीच टेस्ट क्रिकेटमधील न्यूझीलंड टीमचं कर्णधारपद सोडलं होतं.