Shivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड
Shiv Sena Foundation Day 4 Big Rebel Leaders: बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेनेला बंड ही काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत शिवसेनेमध्ये चार मोठी बंड झाली आहेत. ही बंड कोणती आणि ती कोणी केली हे पाहूयात. आजच्या वर्धापनदिनानिमित्त या इतिहासावर टाकलेली नजर...
Swapnil Ghangale
| Jun 19, 2024, 11:46 AM IST
1/10
2/10
3/10
4/10
5/10
शिवसेनेत बंड करुन बाहेर पडणाऱ्यांमध्ये नारायण राणेंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. मूळचे कणकवलीचे असणारे राणे यांनी चेंबूरमधून एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 1990 ला राणे मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1999 ला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्याच वर्षी शिवसेना-भाजपा युतीचा पराभव झाल्याने राणे विरोधीपक्ष नेते झाले.
6/10
7/10
8/10
2006 च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
9/10
शिवसेनेमध्ये झालेलं सर्वात ताजं बंड हे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आहे. शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आणि एकंदरित 20 वे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यापासून प्रभावित होऊन शिंदेंनी 1980 च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला. 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली आणि ते निवडणूक जिंकून नगरसेवक झाले. 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2004, 2009, 2014, 2019 असे सलग चार वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारुन पक्षावर दावा सांगितला.
10/10