शोकाकुल वातावरणात शहीद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप
शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी दिल्यानंतर जड अंत:करणाने अखेरचा निरोप
सचिन मोरे अमर रहे, अशा जयघोषात लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी निरोप
1/6

सुपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी देण्यात आली. सैन्यदलाच्या १४ सशस्त्र जवानांनी ही सलामी दिली. त्यानंतर मानाचा तिरंगा सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिन यांची पत्नी सारिका यांच्याकडे सुपूर्त केला. वीरमाता जिजाबाई, वीरपत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली, यांनी या तिरंग्याचा स्वीकार केला. जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिवाला पुतण्या हर्षलकडून मुखाग्नी देण्यात आला. पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे..सचिन मोरे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी आणि जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. ( सर्व छाया - किरण ताजणे, नाशिक)
2/6

3/6

4/6

6/6
