पत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन
Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Aug 31, 2023, 14:41 PM IST
1/15
2/15
3/15
4/15
तामीळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये एटली कुमारचा समावेश होतो. सर्वात प्रतिभा संप्पन दिग्दर्शकांपैकी एक म्हणून एटलीकडे पाहिलं जातं. एटलीचा जन्म तामीळनाडूतल्या मदुरईमध्ये झाला. त्याचा वाढदिवस 21 सप्टेंबर रोजी असतो. अटली हा केवळ 37 वर्षांचा आहे. एटलीचं संपूर्ण नाव अरुण कुमार आहे.
5/15
6/15
‘राजा राणी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने दक्षिण भारतात पहिल्या 4 आठवड्यांत 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. रोमॅन्टीक कॉमेडी जनेरमधील 'राजा राणी’ तुफान यशस्वी ठरला. या चित्रपटात आर्या, जय, नयनतारा, नाझरीया नाझिम, सत्यराजा असे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते.
7/15
‘राजा राणी’च्या यशानंतर एटलीला ‘सर्वोत्तम दिग्दर्शक (पदार्पण)’ पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मानाच्या विजय अवॉर्ड्स सोहळ्यात एटलीला हा सन्मान देण्यात आला. ‘राजा राणी’ चित्रपटाआधी एटली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. त्याने एस शंकर यांच्या एन्थीरान (2010) आणि नानबान (2012) चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.
8/15
9/15
10/15
11/15
12/15
13/15
14/15
15/15